CBSE 10th Result 2022 : CBSE 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर, कशी मिळवाल गुणपत्रिका? जाणून घ्या...
CBSE 10th Result 2022 : यावेळी सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती.
CBSE 10th Result 2022 : सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE ) 11 मार्च रोजी 10वी टर्म-1चा निकाल जाहीर केला आहे. परंतु, विद्यार्थी त्यांचे निकाल अधिकृत वेबसाईटवर पाहू शकणार नाहीत. अहवालानुसार, सीबीएसईने शाळांना मेलद्वारे हा निकाल पाठवला आहे. यासाठी विद्यार्थी त्यांच्या संबंधित शाळांशी संपर्क साधू शकतात आणि जाऊन त्यांचे स्कोअर कार्ड अर्थात गुणपत्रिका मिळवू शकतात. स्कोअरकार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांचा तपशील असू शकतो.
तर, शाळा अधिकारी अधिकृत शैक्षणिक मेल आयडीद्वारे हा निकाल पाहू शकतात. अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे गुण तपासता येतील.
यावेळी सीबीएसईने अधिकृत वेबसाईटवर निकाल जाहीर केलेला नाही. यापूर्वी संकेतस्थळावर निकाल जाहीर होतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. शाळा विद्यार्थ्यांचा निकाल डाऊनलोड करू शकते. लवकरच 10वी टर्म 1चे निकाल देखील अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील अशी अपेक्षा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या संख्येने विद्यार्थी निकाल जाहीर करण्याची मागणी करत होते. त्यानंतर CBSE ने विद्यार्थ्यांचे निकाल शाळांना मेलद्वारे पाठवले आहेत.
12वीचा निकाल लवकरच जाहीर होणार!
दहावीच्या निकालानंतर आता बारावीचा निकालही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईने 11 मार्चच्या टर्म 2च्या परीक्षांच्या डेटशीटही प्रसिद्ध केल्या आहे. या परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होतील. संपूर्ण टाईम-टेबल वेबसाईटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.
टर्म 2च्या सर्व परीक्षा पहिल्या शिफ्टमध्ये घेतल्या जातील आणि त्या ऑफलाइन मोडमध्ये असतील. या परीक्षा कोरोनाच्या नियमांनुसार घेतल्या जातील. परीक्षेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी, परीक्षार्थींनी वेबसाईटला भेट द्यावी.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job Majha : पंजाब नॅशनल बँक, पुणे मेट्रो, पोस्ट ऑफिसमध्ये या' पदांवर मोठी भरती, लवकर अर्ज करा
- Jobs Majha : मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी, फक्त 'ही' पात्रता हवी, पगार दोन लाखांपेक्षा जास्त
- Maharashtra Metro Rail Corporation Limited Recruitment 2022 : मुंबई मेट्रोत मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI