एक्स्प्लोर
Job Majha : पंजाब नॅशनल बँक, पुणे मेट्रो, पोस्ट ऑफिसमध्ये या' पदांवर मोठी भरती, लवकर अर्ज करा
Job Majha : नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आली आहे. भरती कुठे आहे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती...
मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
पोस्ट ऑफीस
- पोस्ट – कर्मचारी कार चालक
- एकूण जागा – 29
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, ड्रायव्हिंग लायसन्स, हलके आणि जड वाहन चालवण्याचा अनुभव किमान तीन वर्ष.
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2022
- अधिकृत वेबसाईट - www.indiapost.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment मध्ये read more वर क्लिक करा. 17 जानेवारीच्या जाहिरातीच्या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पंजाब नॅशनल बँक
- पोस्ट – सफाई कामगार
- एकूण जागा – 34
- शैक्षणिक पात्रता – दहावी पास
- वयोमर्यादा – 18 ते 24 वर्ष
- नोकरीचं ठिकाण - अहमदनगर, अकोला, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नांदेड, नाशिक
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 16 मार्च 2022
- अर्ज पाठवण्याचा पत्ता- मुख्य व्यवस्थापक, मानव संसाधन विभाग, पंजाब नॅशनल बँक, दुसरा मजला, वुडलँड टॉवर, जुना गंगापूर नाका, गंगापूर रोड, नाशिक 422005
- अधिकृत वेबसाईट - www.pnbindia.in
- https://mahasarkar.co.in/punjab-national-bank-recruitment/
महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे
- पोस्ट - सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, ग्रंथपाल
- एकूण जागा – 08
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2022
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पोस्ट - कळंब – वालचंदनगर, तालुका: इंदापूर, पुणे 413114
- अधिकृत वेबसाईट - www.dkkkpmba.com
पुणे मेट्रो रेल्वे
विविध पदांसाठी ही भरती होत आहे.
- पोस्ट - मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महाव्यवस्थापक, अतिरिक्त मुख्य महाव्यवस्थापक, सहमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, अग्निशमन अधिकारी
- एकूण जागा – 40
- शैक्षणिक पात्रता – CA आणि पदवीधर (विस्ताराने महत्वाची माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
- नोकरीचं ठिकाण – पुणे
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मार्च 2022
- अधिकृत वेबसाईट - www.punemetrorail.org (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
संबंधित बातम्या :
Jobs Majha : मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी, फक्त 'ही' पात्रता हवी, पगार दोन लाखांपेक्षा जास्त
Maharashtra Metro Rail Corporation Limited Recruitment 2022 : मुंबई मेट्रोत मेगाभरती; जाणून घ्या अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया
Bank Jobs : बँकेत नोकरीची संधी; 'या' पदांवर मोठी भरती, आज शेवटची तारीख, लवकर अर्ज करा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement