एक्स्प्लोर

CAT Exam 2021: तीन टप्प्यात होतेय कॅट परीक्षा, या गोष्टींवर आहेत निर्बंध 

CAT 2021, CAT Exam 2021, CAT Exam Guidelines : देशभरात आजपासून IIM कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट म्हणजे कॅट परीक्षा होत आहे.

CAT 2021, CAT Exam 2021, CAT Exam Guidelines : देशभरात आजपासून IIM कॉमन अ‍ॅडमिशन टेस्ट म्हणजे कॅट परीक्षा होत आहे. एमबीएला प्रवेश घेण्यासाठी कॅट परीक्षा (CAT Exam 2021) अनिवार्य करण्यात आली आहे. प्रत्येकवर्षी या परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. यंदाची कॅट परीक्षा आज, 28 नोव्हेंबर 2021 रोजी होत आहे. ही परीक्षा तीन टप्प्यात होत आहे. या परीक्षेत चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रँक आणि प्रिफरेंसच्या आधारावर आयआयएममध्ये प्रवेश मिळतो. आयआयएमच्या अधिकृत iimcat.ac.in  या संकेतस्थळावर (IIM Official Website) कॅट परीक्षासंदर्भातील नियमावली जारी करण्यात आली आहे. या परीक्षेदरम्यान काही निर्बंध लावण्यात आले आहेत. (CAT Exam Guidelines).

देशातील कोरोना महामारीचा प्रादुर्भाव (Covid 19 Pandemic) अद्याप संपलेला नाही, धोका कायम आहे. अशा परिस्थितीत कॅट परीक्षा (CAT Exam 2021) देणाऱ्या उमेदवारांना काळजी घेणं गरजेचं आहे. आयआयएमच्या अधिकृत संकेतस्थळ iimcat.ac.in यावर परीक्षेसी निगडीत नियम आणि अटी (CAT Exam Guidelines) जारी करण्यात आल्या आहेत. या नियमांचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरुन प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासोबतच निर्देश काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. याचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.  

परीक्षेला जाताना काय कराल?
प्रवेशपत्रासोबत (CAT 2021 Admit Card) उमेदवाराचे फोटो ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. मतदार आयडी, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, कॉलेज आयडी यापैकी कोणतेही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या कोरोना नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. PWD श्रेणीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना आरोग्य प्रमाणपत्र सक्तीचं कऱण्यात आलं आहे.

कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं - 

कॅट परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि परीक्षा घेणाऱ्या केंद्राला कोरोना नियमांचं पालन (Covid 19 Protocol) करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. सर्व उमेदवारांना मास्क परिधान करणं सक्तीचं करण्यात आलं. सॅनिटाजरने हात साफ करावे लागेल. तसेच सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणेही सक्तीचं करण्यात आलं आहे. परीक्षा देणाऱ्यांनी आणि घेणाऱ्यांनी कोरोना नियमांचं पालन करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.

या तीन सत्रात परीक्षा – 
स्लॉट एक - सकाळी साडेआठ ते साडेदहापर्यंत
स्लॉट दोन – दुपारी साडेबारा ते दुपारी अडीचपर्यंत
स्लॉट तिसरा - संध्याकाळी साडेचार ते संध्याकाळी साडेसहापर्यंत

परीक्षेला जाताना या गोष्टी टाळा -
कॅट परीक्षा 2021 संदर्भात (CAT Exam 2021)  काही गोष्टींवर निर्बंध लावण्यात आले आहेत. पाहूयात त्याबाबत... 

1- जीन्स, ट्राउजर आणि पँटमध्ये जास्त बटन असू नयेत.  
2- कोणत्याही प्रकारचे दागिणं वापरण्यास मनाई
3- परीक्षा हॉलमध्ये कोणतीही महागडी गोष्ट घेऊन जाण्यास मनाई 
4- हातावर मेंहगी लावण्यास मनाई 
5- परीक्षा हॉलमध्ये बॅग घेऊन जाण्यास मनाई 
6- कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट, मोबाइल फोन, घड्याळ, कॅलकुलेटर अथवा काळा चष्मा घेऊन जाऊ शकत नाही.  

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur School Opening : शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना संघ मुख्यालयाची सफरABP Majha Headlines :  1:00PM : 1 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPratap Sarnaik vs Jitendra Awhad : जिथे रेव्ह पार्ट्या सुरु आहेत तिथे कारवाई झालीच पाहिजेAnil Deshmukh on Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात, अहवाल कधी येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Rajeshwari Kharat Relationship :  ''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
''शालूने जब्याला धोका दिला'', राजश्री खरातचं जमलं? नेटकऱ्यांकडून फोटोवर कमेंट्सचा पाऊस
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
आनंदाच्या भरात लोक पाण्यात जातात आणि..., भुशी डॅम दुर्घटनेप्रकरणी मंत्री अनिल पाटील यांचं सभागृहात निवेदन
T20 World cup: विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या 11 खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी BCCIचे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव; विरोधकांचा सभात्याग
टीम इंडियाच्या खेळाडुंचं अभिनंदन करण्याऐवजी सभागृहात आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडल्याचा आरोप, विरोधकांचा सभात्याग
Nashik Teachers Constituency Election Result 2024 : मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका; मतमोजणी केंद्रावर खळबळ
Embed widget