HSC Result : बारावीचा निकाल न दिल्यामुळे नाशिकचं पोरगं कोर्टात, न्यायमुर्तींनी शिक्षण मंडळाला झापले, काय आहे प्रकरण?
HSC Result :10वी मध्ये विज्ञान विषय न घेता 12वीत विज्ञान शाखा निवडल्याने एका विद्यार्थ्याचा बारावीचा निकाल राज्य शिक्षण मंडळाने अडवल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला खडेबोल सुनावले.
HSC Result : मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) एक फारच आश्चर्यकारक प्रकरणावर निर्णय दिला आहे. नाशिकमधील एका विद्यार्थ्याला 12 मध्ये विज्ञान शाखेतून अभ्यास करण्यापासून अडवण्यात येत होते. खरंतर या विद्यार्थ्याने त्याचे दहावीपर्यंतचे शिक्षण आयसीएसई (ICSE) बोर्डातून पूर्ण केले होते. त्यानंतर त्याने अकरावीसाठी राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत महाविद्यालयातून विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. त्याने त्याच्या शाळेमध्ये इयत्ता दहावीत विज्ञान विषय घेतला नव्हता. त्यामुळे त्याला बारावीमध्ये विज्ञान शाखेतून अभ्यास करण्यास परवानगी दिली जात नव्हती. पंरतु उच्च न्यायालयाने राज्य शिक्षण मंडळाच्या या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत 'यामध्ये काहीही अर्थ नाही असं म्हटलं आहे.'
बार अँन्ड बँचने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायाधीश गौतम पटेल आणि निलम गोखले यांच्या खंडपीठाने या प्रकरणामध्ये विशेष टिप्पणी केली आहे. 'विद्यार्थी इयत्ता 9 आणि 10 मध्ये त्यांच्या आवडत्या विषयांची निवड करतात. त्यामुळे 14 वर्षांचा मुलाचा निर्णय त्याचं संपूर्ण भविष्य ठरवू शकतो, हा विचार करणं चुकीचं आहे', असं न्यायालयाने म्हटलं.
'यामध्ये आम्हाला कोणताही तर्क दिसत नाही'
यावेळी न्यायालयाने म्हटलं की, 'दहावीमध्ये विद्यार्थ्याने जर विज्ञान विषय घेतला नाही तर त्यांना पुढेही विज्ञान शाखेमध्ये प्रवेश करता येणार नाही, या नियमामध्ये आम्हाला कोणताही तर्क आहे असं वाटत नाही. खरंतर 10 मध्ये नाही तर 8 आणि 9वी मध्येच विद्यार्थ्यांना विषय निवडावे लागतात. त्यामुळे चौदा वर्षांचं मूल त्याच्या संपूर्ण भविष्याचा निर्णय घेईल ही अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे.'
यादरम्यान न्यायालयाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा देखील दाखला दिला. न्यायालयाने म्हटलं की, 'राष्ट्रीय शैक्षणिक धोराणामध्ये पूर्णपणे बदल होणार आहेत. त्यामुळे आता विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील जुनी रस्सीखेच आता संपणार आहे आणि हे अगदी बरोबर आहे.'
तसेच यावेळी न्यायालयाने शिक्षण मंडळाला खडसावत त्यांचा नेमका हेतू काय होता असा सवाल उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना मदत करणं की त्यांनी नव्या पद्धतीने अडकवणं हा शिक्षण मंडळाचा हेतू होता असं म्हणत उच्च न्यायालयाने शिक्षण मंडळाला चांगलेच खडेबोल सुनावले. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्याचा बारीवाची निकाल देण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नाशिकच्या एका विद्यार्थ्याने आयसीएसई बोर्डात दहावीमध्ये 92 टक्के मिळवून यश संपादन केलं होतं. त्याने पुढे अकरावी आणि बारावीसाठी विज्ञान शाखेची निवड केली. त्याने राज्य शिक्षण मंडाळामधून इयत्ता बारीवीचा परिक्षा देखील दिली. परंतु बोर्डाच्या आदेशाप्रमाणे त्याचा निकाल थांबण्यात आला. तेव्हा बोर्डाने असं सांगितलं की, या विद्यार्थ्याने दहावीमध्ये विज्ञान विषय घेतला नव्हता त्यामुळे विज्ञान शाखेतील त्याचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. बोर्डाच्या या निर्णयाविरोधात या मुलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Monsoon Update : मान्सून कोकणात धडकला, राज्यात पुढील 4 दिवस धो धो पावसाचा इशारा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI