एक्स्प्लोर

Maharashtra Law Colleges: कायद्याच्या शिक्षणासाठी प्रवेश घेताय? 243 विधी महाविद्यालयांना बार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यताच नाही

Maharashtra Law Colleges: राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना (Law College) बार कौन्सिल ऑफ इंडियाची (The Bar Council Of India) मान्यताच नसल्याचे समोर आले आहे.

Maharashtra Law Colleges: मागील काही वर्षात अनेकांचा कायद्याचे शिक्षण घेण्याकडे कल वाढत चालला आहे. मात्र, राज्यातील 243 विधी महाविद्यालयांना (Law College) बार कौन्सिल ऑफ इंडियाची (The Bar Council Of India) मान्यताच नसल्याचे समोर आले आहे. मुंबईसहित महाराष्ट्र राज्यात 316 महाविद्यालयांमध्ये विधी शिक्षण दिले जाते. परंतु 243 महाविद्यालयात बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता किंवा परवानगी नुतनीकरण झाले नसल्याची बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते (RTI Activist) अनिल गलगली (Anil Galgali) यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अशा महाविद्यालयात प्रवेश बंद करण्याची मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुंबई  विद्यापीठ, टिळक विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अशा विद्यापीठाच्या अंतर्गत 316 पैकी फक्त 71 महाविद्यालयांकडे बार कौन्सिल ऑफ इंडियाची परवानगी आहे. तर, दोन महाविद्यालये बंद आहेत. 

नामांकित असलेले गव्हमेंट लॉ कॉलेज, जितेंद्र चौहान लॉ कॉलेज, केसी लॉ कॉलेज, पद्मश्री डीवाय पाटील लॉ कॉलेज, सिद्धार्थ लॉ कॉलेज, डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज, न्यू लॉ कॉलेज, रिझवी लॉ कॉलेज, एसएनडीटी लॉ कॉलेज, टिळक लॉ कॉलेज, मॉडर्न लॉ कॉलेज सिंबायोसिस लॉ कॉलेज, अंजुमन इस्लाम लॉ कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज या विधी महाविद्यालयांकडे परवानगी आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षण सचिव यांस लेखी पत्र पाठवले आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण नसल्यास त्या महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियापासून मज्जाव करण्याची मागणी गलगली यांनी केली आहे. सध्या बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण नसलेल्या विधी महाविद्यालयावर दंडात्मक कारवाई करत मान्यता रद्द करण्याची आवश्यकता असल्याचे गलगली यांनी नमूद केले आहे. खरे पाहिले तर मुंबई विद्यापीठ किंवा अन्य विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या सर्व विधी महाविद्यालयाची प्रत्येक शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि परवानगीची माहिती संकलित करण्याची गरज आहे. विशेष करुन बार कौन्सिल ऑफ इंडिया यांची मान्यता नसलेल्या किंवा परवानगी नुतनीकरण केल्याचे कागदपत्रे प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केल्यास विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस सत्य परिस्थिती लक्षात येईल, असेही गलगली यांनी म्हटले आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ७ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 14 January 2025सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 14 January 2025 06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025AI GirlFriend | आता मिळणार न सोडून जाणारी AI गर्लफ्रेंड, काय आहेत वैशिष्ट्ये? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, आवाजाचे नमुने
वाल्मिक कराडविरुद्धच्या कारवाईला वेग, सीआयडीने पुराव्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचललं
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Embed widget