बेस्ट ऑफ लक! आज दहावीचा निकाल, दुपारी 1 वाजता जाहीर होणार, कुठे पाहाल?
Maharashtra Board SSC Result 2024: आज दुपारी 1 वाजता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल.
SSC Board Result 2024 : मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज दहावीचा निकाल (SSC Result 2024) जाहीर केला जाणार आहे. आज (27 मे 2024) रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra SSC Exam Result 2024) अधिकृत वेबसाईटवर दुपारी एक वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. निकालाची तारीख जाहीर होणार असल्यानं विद्यार्थ्यांची आणि त्यासोबतच पालकांचीही धाकधूक वाढली आहे. तर अकरावीची पूर्व प्रवेश प्रक्रिया परवापासूनच सुरू झाली आहे.
निकाल जाहीर करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं पत्रकार परिषद घेतली जाईल. पत्रकार परिषदेतून निकालासंदर्भातील ठळक माहिती दिली जाईल. शैक्षणिक वर्ष 2023 -2024 मध्ये दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 9 हजार 544 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांसह पालकांचीही निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
दहावीचा निकाल जिथं पाहणार त्या वेबसाईटची यादी
- https://mahresult.nic.in
- http://sscresult.mkcl.org
- https://sscresult.mahahsscboard.in
- https://results.digilocker.gov.in
- https://results.targetpublications.org/
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या mahresult.nic.in या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : होमपेजवरील दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : तुमच्या लॉगीन डिटेल्स, परीक्षा क्रमांक, आईचं नोंदवा.
स्टेप 4 : स्क्रीनवर तुमचा निकाल उपलब्ध होईपर्यंत थांबा.
स्टेप 5 : निकाल उपलब्ध झाल्यानंतर तो पीडीएफ फॉरमॅटमध्ये डाऊनलोड करा किंवा त्याची प्रिंट आऊट घ्या.
दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची छापील प्रत काही दिवसांनतर त्यांच्या संबंधित शाळांमध्ये उपलब्ध होईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच दहावीची परीक्षा पार पडली होती. आता निकाल जाहीर होण्यास काही तासांचा कालावधी राहिल्यानं विद्यार्थ्यांची धाकधुक वाढली आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार
राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी पहिल्या टप्प्यातील नोंदणीला 24 मे रोजी सुरुवात झाली आहे. आता दहावीचा निकाल उद्या जाहीर झाल्यानंतर या प्रक्रिेयेला गती मिळेल. मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे राबवली जाते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI