एक्स्प्लोर

Worli Accident : ओळख लपवण्यासाठी मिहीरने केस कापले आणि दाढी केली, 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Mihir Shah : आरोपी मिहीर शाहने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवली नाखवा दाम्पत्यांच्या गाडीला धडक दिली. त्यामध्ये कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई : वरळी हिट अॅड रन प्रकरणातील (Worli Hit And Run Case) मुख्य आरोपी मिहीर शाहाला (Mihir Shah) शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गाडीची नंबर प्लेटही गहाळ झाली असून तिचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी केल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती.

गुन्हा केल्यानंतर कारच्या नंबरप्लेटची विल्हेवाट कुठे लावली याची माहिती आरोपी देत नाही. तसेच त्याला पळून जाण्यासाठी कुणी मदत केली याचीही माहिती आरोपी देत नाही असा युक्तिवाद पोलिसांकडून करण्यात आला. गुन्ह्यातील कार ही कोणाची आहे ,ती त्याला कुणी वापरायल दिली याच तपास होणे गरजचे आहे असं पोलिसांनी सांगितलं. 

ओळख लपवण्यासाठी केस कापले आणि दाढी काढली

अपघात झाल्यानंतर आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी गाडीतच केस आणि दाढी कापल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. आरोपीच्या वडिलांनी अपघाताचा मुख्य पुरावा असलेली गाडी लपवण्याचा प्रयत्न केल्याचं तपासातून स्पष्ट झालं आहे. 

आरोपी कुठल्याही थराला जावू शकतात. न्यायालयात सहानभूती मिळवण्यासाठी आरोपीकडून प्रयत्न सुरू आहे. वरळी अपघातात एका महिलेची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यासाठी आरोपीची जास्तीत जास्त कस्टडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. 

कुठल्याही पुराव्याला धक्का नाही, मिहीरच्या वकिलांचा दावा

सरकारी वकिलांच्या युक्तिवादानंतर मिहीर शाहाच्या वकिलांनी युक्तीवाद केला. ते म्हणाले की, यातील एका आरोपीला मंगळवारी हजर  केले आहे. आरोपीकडून तपासाला सहकार्य केलं जात आहे. तपासात 95 टक्के माहिती आणि पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. आम्ही कुठल्याही पुराव्यांना धक्का लावलेला नाही. आरोपीचे रक्ताचे नमुनेही घेतलेले आहे. 

मिहीर शाहाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवून वरळीमधील अॅट्रिया मॉलजवळ कावेरी नाखवा या महिलेचा जीव घेतला होता. त्यानंतर तो फरार झाला. आता पोलिसांनी दोन दिवसांनंतर त्याला शहापूरमधून अटक केली.

दरम्यान, वरळी अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून आरोपीचा फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. 

ही बातमी वाचा: 

राजेश शाह, मिहीर शाह हे राक्षसच, कोळीवाड्याच्या चौकात सोडा असं लोक म्हणतायत, नाखवा कुटुंबाच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंचा हल्ला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रस्त्यावर धोकादायक स्टंट करणं अंगलट; पोलिसांनी पाठलाग करुन पडकलं, 20 वर्षीय तरुणाला अटक
रस्त्यावर धोकादायक स्टंट करणं अंगलट; पोलिसांनी पाठलाग करुन पडकलं, 20 वर्षीय तरुणाला अटक
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार

व्हिडीओ

Jayant Patil on NCP Merger : विलिनीकरणाची चर्चा थांबली, ज्यांच्याशी चर्चा केली ते दादाच नाहीत
Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Who is Ali Larijani: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
अली लारीजानी: अवघं नेतृत्व संपलं, मृत्यू अवघा छाताडावर नाचत असतानाही अमेरिका- इस्रायलला 'कधीही न विसरता येण्यासारखा धडा' शिकवणारा पडद्यामागचा इराणी 'सेनापती'
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल मॅचचं तिकीट मिळवण्याची शेवटची संधी? एका तिकिटासाठी किती रुपये मोजावे लागणार?
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
तहसिलदार मॅडम पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या! 'तो' व्हिडिओ व्हायरल होताच मुख्य सचिवांकडून थेट चौकशीचे आदेश
Share Market Crash : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धाचा फटका,सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 1100 अंकांनी कोसळला, एका दिवसात गुंतवणूकदारांचे 10 लाख कोटी बुडाले
Ayatollah Ali Khamenei: इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
इस्त्रायलनं कधीकाळी खिशातील पेजर हॅक करून स्फोट घडवल्यानंतर CIA च्या मदतीनं कार्यालयात ये-जा करणाऱ्या अयातुल्ला अली खोमेनींचा माग कसा काढला?
Vasai Crime News: चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चार जण दुचाकीवरून आले; वाहतूक पोलिसांनी अडवताच राग, हुज्जत घातली अन् दगडाने अधिकाऱ्यावर केला हल्ला करत डोकं ठेचलं, वसईतील धक्कादायक घटना
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
चोरीचा आरोपात पोलिसांकडून जबर मारहाण, मुलीने संपवले जीवन; आई-वडिलांचा टाहो, पोलीसात धाव
Iran : अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
अमेरिका-इस्त्रायल विरुद्ध इराण किती दिवस लढू शकतो? इराणकडे किती शस्त्रसाठा? जाणून घ्या
Embed widget