Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन विदेशी व्यक्तीशी झालेली मैत्री महागात पडली, वर्ध्यातील महिलेला 27 लाखांचा चुना
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन विदेशी व्यक्तीशी झालेली मैत्री महागात पडलीये. वर्ध्यातील एका महिलेची 27 लाखांची फसवणूक करण्यात आलीये.
Wardha Crime : इन्स्टाग्रामवरुन (Instagram) विदेशी व्यक्तीशी झालेली मैत्री वर्धा जिल्ह्यातील (Wardha Crime) आर्वीच्या महिलेला चांगलीच महागात पडलीये. इंस्टाग्रामवरील विदेशी मित्राने वर्ध्यातील आर्वीच्या महिलेला 27 लाखांचा चुना लावलाय. विदेशी गिफ्ट पाठवून ते कस्टम विभागाने पकडले असल्याची बतावणी करत महिलेची (Fraud Case) फसवणूक करण्यात आली आहे. आर्वीतील या महिलेकडून पोलीस केस टाळण्यासाठी वेळोवेळी मागणी करत 27 लाख 38 हजार रुपये उकळण्यात आले आहेत. दरम्यान, याप्रकरणी आता सायबर पोलिसात (Wardha Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय.
ऑनलाइन रक्कम पाठवायला भाग पाडले जायचे
अधिकची माहिती अशी की, विदेशी व्यक्तीची इन्स्टाग्रामवर झालेली ओळख वर्ध्याच्या आर्वी येथील महिलेला चांगलीच महागात पडली आहे. विदेशी व्यक्ती सोबत मैत्री करणाऱ्या महिलेला विदेशातून मित्राकडून येणाऱ्या गिफ्टवर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडले असल्याचा दावा केला जायचा आणि ऑनलाइन रक्कम पाठवायला भाग पाडले जायचे. अशा बनावट मित्राने ऑनलाइन गंडा घालत तब्बल 27 लाख 38 हजार रुपयांचा चुना लावलाय. लक्षात येताच महिलेने वर्धा पोलिसात धाव घेतलीय.
पोलिस केस टाळण्यासाठी ऑनलाइन पैसे टाकण्याची भीती दाखविली
वर्ध्याच्या आर्वी येथे महिलेची एका व्यक्तीची इंस्टाग्रामवर ओळख झाली, तो विदेशात राहत असल्याचे सांगत मैत्रीही केली. मग या मित्राने विदेशी गिफ्ट व रक्कम पाठवून ते दिल्ली येथे कस्टम विभागाने पकडल्याचे सांगत वेळोवेळी कस्टम अधिकाऱ्यांना ऑनलाइन युपीआयच्या माध्यमातून पैसे टाकायला सांगितले. विदेशी चलनाचे नाणे पार्सलमध्ये सापडले आहे आणि पोलिस केस टाळण्यासाठी ऑनलाइन पैसे टाकण्याची भीती दाखविली गेली. पैशांची मागणी होत असल्याने वेळोवेळी भीतीपोटी महिलेने चक्क 27 लाख 38 हजार रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीच्या खात्यावर वेळोवेळी वळती केली. मोठी रक्कम ट्रान्सफर केल्याने महिलेने सायबर पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
नराधम विशाल गवळीचा 2023 मध्येही एका मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आईनेच सांगितलं मुलगी तावडीतून कशी सुटलीhttps://t.co/otT2m8Hyk1#VishalGawli #KalyanCrime #Kalyan
— ABP माझा (@abpmajhatv) December 26, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या