Wardha Accident : चलना बाह्य नोटांचा कागदी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात; अपघातानंतर ट्रकला भीषण आग
Wardha Accident News: वर्धा जिल्ह्यातून अपघाताची एक बातमी समोर आली आहे. चलना बाह्य नोटांचा कागदी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातानंतर ट्रकला आग लागली आहे.
वर्धा : वर्धा जिल्ह्यातून अपघाताची (Wardha Accident News) एक बातमी समोर आली आहे. चलना बाह्य नोटांचा कागदी चुरा घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातानंतर ट्रकला आग लागली असल्याची माहिती पुढे आली आहे. चलना बाह्य नोटांना कागदी चुरा घेऊन जात असताना या ट्रकला अपघात झाला आहे. वर्ध्याच्या नागपूर-वर्धा रोड वर सिंधी येथे ही घटना घडली आहे. तर निवडणूक काळात ट्रकमध्ये चलनी नोटांचा चुरा व त्याला लागलेली आग बघून स्थानिकांमध्ये अफवांना पेव फुटल्याचेही चित्र आहे. या प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलीसांकडून या घटनेची सध्या सखोल चौकशी केली जात आहे. मात्र अचानक झालेल्या या अपघात आणि अपघातानंतर ट्रकला लागलेल्या आगीच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
नोटांचे तुकडे आढळून आल्याने अनेक चर्चा आणि अफवांना पेव
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे भागात कांढळी येथे ट्रक जळाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, ट्रकमध्ये नेमकं काय जळत आहे या बाबत बघ्यामध्ये एकच उत्सुकता असल्याचे बघायला मिळाले. दरम्यान, ट्रकजवळ काही कापलेल्या नोटांचे तुकडे आढळून आल्याने अनेक चर्चा आणि अफवांना पेव फुटल्याचेही बघायला मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा ट्रक उत्तर प्रदेशकडून महमार्गाने हैदराबादकडे जात असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र हा अपघात आणि त्यानंतर लागलेल्या आगीचा सध्या पोलीस तपास करत आहे.
परशुराम घाटात पुन्हा एकदा अपघात
दरम्यान, मुंबई - गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पुन्हा एकदा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात बसने कंटेनरला जोरदार धडक दिली आहे. तर या अपघातानंतर मागून येणारी कार आणि बाईक देखील नियंत्रण सुटल्यामुळे एकमेकांवर आदळले आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नसली तरी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अपघातामध्ये एकाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. निमुळत्या रस्त्यामुळे परशुराम घाट वाहतुकीसाठी धोकादायक बनलाय का? असा सवाल आता नव्यानं विचारला जाऊ लागला आहे. दरम्यान, थंडीची चाहूल लागल्याने घाट परिसरात धुके असल्यामुळं वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तर काल ( शनिवारी) सुद्धा याच ठिकाणी अपघात होउन महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे.
हे ही वाचा