(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Virar Crime News: धावत्या गाडीत महिलेचा विनयभंग, लहानग्याची हत्या; आरोपीच्या लाय डिटेक्टर चाचणीसाठी विरार पोलिसांची न्यायालयात धाव
Virar Crime News: विरार येथे चालत्या कार मध्ये 21 वर्षीय महिलेवर झालेला विनयभंग आणि तिच्या 11 महिन्याच्या लहानग्या मुलीच्या हत्येप्रकरणी आता आश्चर्यकारक नवीन खुलासे समोर येत आहेत.
Virar Crime News: विरार येथे चालत्या कार मध्ये 21 वर्षीय महिलेवर झालेला विनयभंग आणि तिच्या 11 महिन्याच्या लहानग्या मुलीच्या हत्येप्रकरणी आता आश्चर्यकारक नवीन खुलासे समोर येत आहेत. सदरचा गुन्हा तपासासाठी गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या टिमने यात त्यावेळी गाडीत बसलेल्या चौघांना शोधलं असून, चौघांचे ही कोर्टासमोर जबाब नोंदवण्यात आले आहे. तर यातील मुख्य आरोपी विजय कुशवाह याची लाय डिटेक्टरद्वारे तपास करण्यासाठी वसई न्यायलयात अर्ज केला आहे. याबाबत वसई न्यायलयाने अर्जावर उद्या किंवा परवा आपला फैसला देणार असल्याच कळत आहे.
श्रध्दा हत्याकांडानंतर विरारमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असल्याची चर्चा समाजमाध्यमा समोर मोठ्यानं होतं होती. आता याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपी विजय कुशवाह याची लाय डिटेक्टरद्वारे जबानी घेण्यासाठी वसई न्यायलयात अर्ज केला आहे. याबाबत सध्या तरी वसई न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली नाही. मात्र उद्या किंवा परवा याबाबत वसई न्यायालय आपला फैसला सांगू शकते. मानसशास्त्रीय चाचणी साठी प्रथम आरोपीची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे न्यायालय याबाबत आरोपीची ही इच्छा एकू शकतो. न्यायालयाची मान्यता मिळ्यानंतर पोलीस लाय डिटेक्टरसाठी मुंबईच कलिना किंवा गुजरातमधील अहमदाबाद येथे आरोपीला घेऊन जाऊ शकते.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
शनिवारी 10 डिसेंबर 2022 रोजी 11.30 च्या दरम्यान एका प्रवासी इको कारमध्ये 21 वर्षीय पिडीत महिलेचा विनयभंग करण्यात आला. त्याबरोबर तिच्या 11 महिन्याच्या मुलीला धावत्या कारमधून फेकून देण्यात आल्याचा आरोप पिडीत महिलेने केला होता. यात मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मांडवी पोलिसांनी शनिवारी रात्री तक्रारदार महिलेच्या जबानीप्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला होता. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आता आश्चर्यकारक खुलासे समोर येत आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या टिमने गाडीत बसलेल्या चार आरोपींना शोधलं आहे. तर यातील दोन प्रवासी हे गुजरातचे असल्यामुळे त्यांचा ही शोध सुरु आहे. या चारही सहप्रवासी असलेल्यांची जबानी वसई न्यायालयासमोर न्यायमूर्ती समोर करण्यात आली आहे.
पिडित महिलेच्या म्हणण्यांनुसार, पिडीत महिलेचा पती हा पेल्हार येथे काम करत आहे. आपल्या पतीला भेटण्यासाठी पिडीत महिला पेल्हारला आली होती. मात्र पती मस्तान नाका येथे गेल्याने, ती आपल्या मुलीसोबत मस्तान नाका, मनोर येथे जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग येथील पेल्हार फाटा येथून सकाळी 11.30 च्या सुमारास मारुती कंपनीची इको या प्रवासी कारमध्ये बसली. कार सुरु झाल्यानंतर कारमधील इसमांनी तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. मागील सिटवर बसलेल्या इसमांनी तिच्या 11 महिन्याच्या मुलीला धावत्या कारमधून फेकून दिलं. त्यानंतर तीने आपल्या बाळासाठी स्वतः धावत्या कारमधून उडी मारली. त्यात ती जखमी झाल्याची माहिती पिडीत महिलेने पोलिसांना सांगितली. घटनेच्या वेळी कारच्या मागे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांची गाडी होती. महिला आणि मुलं खाली पडल्यावर महिलेला आणि लहान मुलाला महामार्ग पोलिसांनी त्याच कारमध्ये बसवून, तात्काळ वसई विरार शहर महानगर पालिकेच्या नालासोपारा पूर्वेकडील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यामुळेच तिच्यावर वेळेवर उपचार होऊ शकले. तसेच कार चालक विजय कुशवाह आणि गुन्ह्यात वापरलेली कार मांडवी पोलिसांना तात्काळ ताब्यात घेतली. या घटनेत दुर्दैवाने लहानगीचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.