Lalit Prabhakar Coment On Marriage: 'मेरी दुल्हन तो...', ललित प्रभाकरनं स्पष्टच सांगून टाकलं, लग्नाबाबत म्हणाला...
Lalit Prabhakar Coment On Marriage: ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांनी एकत्र 'जस्ट नील थिंग्स'ला मुलाखत दिली. त्यावेळी दोघांनाही लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला.

Lalit Prabhakar Coment On Marriage: मराठी मालिकाविश्व (Marathi Serials) आणि सिनेसृष्टीतला (Marathi Films) मोस्ट चार्मिंग स्टार म्हणजे, ललित प्रभाकर (Lalit Prabhakar). ललित आज अनेक तरुणींच्या गळ्यातील ताईत आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या मनात हक्काची जागा निर्माण केल्यानंतर ललित मराठी सिनेसृष्टीकडे वळला. सध्या तो त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'आरपार'मुळे चर्चेत आहे. याचनिमित्तानं ललित प्रभाकर आणि त्याच्यासोबत 'आरपार' सिनेमात झळकलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे यांनी एकत्र मुलाखत दिली. त्यावेळी त्यांना लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दोघांनीही लग्न करण्याबाबत आणि लग्न न करण्याबाबतचं आपलं मत व्यक्त केलं.
ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांनी एकत्र 'जस्ट नील थिंग्स'ला मुलाखत दिली. त्यावेळी दोघांनाही एक प्रश्न विचारण्यात आला. हृता दुर्गुळेला तू लग्न का केलंस? असं विचारलं गेलं. तर, ललितला तू लग्न का नाही केलंस, 2025 मध्ये लग्नाबद्दल काय विचार आहेत? असा प्रश्न विचारण्यात आला.
ललित प्रभाकर म्हणाला की, "मेरी दुल्हन तो आझादी ही... मला असं वाटतं की, ही खूप जबाबदारीची गोष्ट आहे आणि मी नाहीये त्यासाठी तयार... कारण- आता माझं ध्येय वेगळं आहे. माझं काम आणि या सगळ्या खूप गोष्टी सुरू आहेत आणि हे सगळं करताना मला मजापण येतेय..."
View this post on Instagram
ललित प्रभाकर नेमकं काय म्हणाला?
ललित प्रभाकर लग्नाबद्दल बोलताना म्हणाला की, "मला असं वाटतंय की, मी लग्नासाठी पूर्णपणे तयार नाहीये आणि असं असताना मला लग्न करून माझ्यावर आणि इतर कोणावरही अन्याय करायचा नाहीये..."
ललितनंत हृतानंही तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याबद्दल हृता म्हणाली, "मला या गोष्टीची स्पष्टता होती की, मला लग्न करायचं आहे. मला सेटल व्हायचं होतं. तुम्हाला अशी स्पष्टता नसेल, तर नका करू लग्न. कारण ही खूप मोठी जबाबदारी आहे. प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, ते लग्नानंआधीही होतं. पण लग्नानंतर दररोज नवीन आवाहन असतं. मात्र, माझा अनुभव खूप चांगला आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























