Virar Crime : स्वतःच्या लग्नासाठीच चक्क चोरी; भावी पत्नीला मंगळसूत्र घालण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचलं
Virar Crime : स्वतःच्या लग्नासाठी लागणाऱ्या सोन्याच्या मंगळसुत्रासाठी एका तरुणाने चक्क चोरीचा मार्ग स्विकारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विरारच्या जुन्या विवा कॉलेजसमोर ही घटना घडली.
Virar Crime : विरारच्या जुन्या विवा कॉलेज परिसरात चोरीची एक अजब घटना घडली. होणाऱ्या बायकोला मंगळसूत्र करायला पैसे नसल्याने तरुणाने चक्क एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र खेचलं आहे. विरारच्या (Virar) जुन्या विवा कॉलेज परिसरातून आपल्या अॅक्टिव्हा स्कुटीवरुन जाणाऱ्या महिलेच्या पाठीमागून येऊन तरुणाने मंगळसूत्र खेचलं. 25 जानेवारीला रात्री 10 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. आरोपी अमित शनवार याने आपल्या स्पोर्ट बाईकवरुन येवून फिर्यादी महिलेच्या गळ्यातील 95,000 किंमतीचं सोन्याचं मंगळसुञ खेचलं आणि फरार झाला. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर आरोपी अटकेत
महिलेने विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखा 3 यांच्याकडे गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला. गुन्हे शाखा 3 ने वेगवगळी पथकं तयार करुन शोध सरु केला असता पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून आरोपीची माहिती मिळाली. आरोपी अमितला त्याच्या मोटारसायकल, सोन्याच्या चैन आणि 73.500 ग्रॅम वजनाची लगडसह एकूण 4 लाख 38 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
लग्नासाठी करत होता सोन्याची जमवाजमव
आरोपी अमित शनवार हा डहाणूच्या तलासरी येथे राहणारा होता. अमित बेरोजगार होता, त्यात त्याचं एका मुलीशी लग्न ठरलं होतं. त्याला आपल्या लग्नासाठी सोन्याची जमवाजमव करायची होती. त्याला आपल्या होणाऱ्या बायकोसाठी मंगळसुञ देखील घ्यायचं होतं आणि यासाठी त्याने चक्क चोरीचा मार्ग स्विकारला. अमितवर विरार पोलीस ठाण्यात एक, अर्नाळा सागरी पोलीस ठाणे येथे दोन आणि नालासोपारा पोलीस ठाण्यात एक असे चार चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
नागपुरात चोरट्यांनी भर चौकातील एटीएम गॅस कटरने फोडलं
सावनेर (Saoner) शहरात भर चौकात असलेलं भारतीय स्टेट बँकेचे एटीएम (ATM) गॅस कटरच्या साहाय्याने फोडल्याची धक्कादायक घटना 30 जानेवारीला समोर आली आहे. या धाडसी चोरीमध्ये (Robbery) आज्ञातांनी एटीएममधून 10 लाख 30 हजारांची रोकड लंपास केली. ही खळबळजनक घटना मंगळवार, 30 जानेवारीच्या पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडली. हा सर्व चोरीचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून कारमधून आलेल्या चार ते पाच अज्ञातांनी हे एटीएम फोडल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
विशेष बाब म्हणजे, बँक व्यवस्थापनाने एसबीआय (SBI) एटीएममध्ये घटनेच्या रात्रीच कॅश टाकली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police) घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. सध्या राज्यात बाहेर राज्यातील टोळी सक्रिय असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलिसांनी तपास पथक नेमून पुढील तपास सुरू केला आहे.
हेही वाचा:
Pune Crime : पत्नीच्या चारित्र्यावर संशयाची सुई, पतीने लॉजवर नेऊन पत्नीला संपवलं; बारामती हादरली