Operation Sindoor 2.0 : पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवण्याची हीच योग्य वेळ; दिल्ली स्फोटानंतर सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची चर्चा
Delhi Bomb Blast News : भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. आता पुन्हा एकदा Operation Sindoor 2.0 राबवण्याची मागणी केली जात आहे.

Delhi Red Fort Metro Station Blast : नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरक्षा यंत्रणांनी सुरू केला आहे. तरीही यामागे काही घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा रोख पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडे आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor 2.0) चर्चा सुरू झाल्याचं दिसतंय.
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटामागे फरिदाबाद कनेक्शन असल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी दिल्ली पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथे कारवाई करत सात दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर संध्याकाळी दिल्लीमध्ये स्फोट झाला.
Operation Sindoor 2.0 : भारताने ऑपरेशन सिंदूर राबवावे
दिल्ली स्फोटानंतर आता सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या जात आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं. त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. दिल्ली हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवावे आणि पाकिस्तानवर पुन्हा एकदा हल्ला करावा अशी मागणी केली जात आहे.
सोशल मिडियावर अनेक यूझर्सनी या घटनेचा निषेध करत ‘Operation Sindoor 2.0’ असा टॅग वापरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका यूजर्सने लिहिले आहे की, ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवत, देशांतर्गत कारवाई करत दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांना संपवलं पाहिजे. आतून मदत मिळाल्याशिवाय कोणताही दहशतवादी हल्ला शक्य नाही.
If #CarBlast near #RedFort turns out to be remotely a Terrorist attack then i would actually want a full clean up within cutting total terror infrastructure and support within than Operation Sindoor 2.0. No terror attack can ever happen without internal support. #DelhiBlast pic.twitter.com/3UjBbTHuYs
— Ganesh (@me_ganesh14) November 10, 2025
एका यूजर्सने लिहिलं आहे की, जर दिल्ली स्फोटामागे पाकिस्तानचा हात असेल तर हे आता सहन करण्यापलिकडचे आहे. त्यांच्या रक्तातच दहशतवाद असले तर पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून संपवावं लागेल. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवावं.
If Pakistan is involved in this, then enough is enough, @narendramodi Ji 🙏. We can’t talk sense into them when terrorism is in their DNA. Delete Pakistan from the world’s map completely. Start Operation sindoor 2.0 start now #RedFort pic.twitter.com/c5fF2OqGdL
— Yash Mishra (@YashInnerCosmos) November 10, 2025
एक यूजरने लिहिलं आहे की, देशातील 140 कोटी जनता तुमच्या पाठीशी आहे, ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवण्याची हीच योग्य वेळ आहे.
Its time government should start Operation Sindoor 2.0 ..
— Akshay sharma (@Akshayshar30) November 10, 2025
140 cr people with you pic.twitter.com/w4CsD5o6bB pic.twitter.com/5M1ijj3hiS
ही बातमी वाचा:























