Maharashtra Live blog: दिल्लीमधील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
LIVE

Background
Delhi bomb blast Live updates: नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात (Delhi Red Fort Blast) आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोमवारी संध्याकाळी दिल्लीत स्फोट झालेली कार पुलवामा येथील तारिकला विकण्यात आली होती. या स्फोटानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी घोषणा केली की लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर हुंडई आय२० कारचा स्फोट झाला.
उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील कंडक्टर अशोक कुमार गुर्जर यांचा मृत्यू; मूळगावी शोककळा
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटात उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी अशोक कुमार गुर्जर यांचा मृत्यू झाला आहे. अशोक कुमार हे दिल्ली परिवहन महामंडळात (DTC) कंडक्टर म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मंगरौला या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. एका नातेवाईकाने सांगितले, 'ते (अशोक कुमार) डीटीसीमध्ये नोकरी करत होते, प्रायव्हेट. ते दिवाळीला आले होते आणि त्यानंतर गेले होते.' या घटनेनंतर संपूर्ण गावात आणि कुटुंबात दुःखाचे वातावरण असून, कुटुंबातील काही सदस्य दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Nitin Gadkari : दोषींवर कठोर कारवाई करणार! केंद्रीय मंत्री गडकरी यांचा इशारा
राजधानी दिल्लीमध्ये काल संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास एका कारमध्ये भीषण स्फोट घडला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील सिग्नलला हा स्फोट झाला. यावेळी दोनदा मोठ्या स्फोटाचा आवाज झाला. या स्फोटामुळे मोठी आग लागली आणि या आगीत काही गाड्या जळून खाक झाल्या. या घटनेमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक जण जखमी असल्याची माहिती मिळतेय.. अद्याप या स्फोटाचा कारण समजलं नसून या प्रकरणातील सर्व शक्यतांची चाचपणी सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी दिलीय. त्यातच या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करणार, असा इशारा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी दिलाय.
























