एक्स्प्लोर

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या मुंबईतील आंदोलनानंतर शिवाजी पार्क पोलिसांची मोठी कारवाई, 3 स्वतंत्र गुन्हे दाखल; नेमकं कारण काय?

Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर परिसरात काल आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

Uddhav Thackeray: पर्यावरणशास्त्रज्ञ सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena UBT) पक्षाच्या वतीने मुंबईतील दादर (Dadar) परिसरात काल आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाप्रकरणी आता पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात (Shivaji Park Police Station) या आंदोलनाविरोधात तब्बल तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Uddhav Thackeray: 'या' 3 कारणांमुळे दाखल झाले गुन्हे

पहिला गुन्हा: विनापरवानगी आंदोलनाचे आयोजन केल्याप्रकरणी आयोजकांवर पहिला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दुसरा गुन्हा: आंदोलनाला पोलिसांची अधिकृत परवानगी नसतानाही लोकांना आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने घटनास्थळी जमण्याचे आवाहन केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल झाला आहे.

तिसरा गुन्हा: मुख्य आंदोलनानंतरही दादर परिसरात ठिकठिकाणी विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यामुळे दादरसारख्या गजबजलेल्या भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली. रस्ता अडवून नागरिकांना वेठीस धरल्याप्रकरणी हा तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही गुन्ह्यांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Uddhav Thackeray: "हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे"; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

दरम्यान, कालच्या आंदोलनात कार्यकर्त्यांना आणि विद्यार्थ्यांना संबोधित करताना ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "हे सरकार आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे. तुम्ही सर्वांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला. आज तुमच्यात जी आग दिसत आहे, ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकूमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. या लोकांनी तुमचं भवितव्य चोरलं आहे," असे त्यांनी म्हटले

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, "सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिलंय, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. उणे तापमानात बर्फामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी 'सोलर कॅम्प' बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम 'आइस माउंटेन' ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही आणि चीनचे हस्तक ठरवत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे," असे देखील त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Actress Antara Banerjee Attacking RPF Officer: स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
स्वतःचे कपडे काढले, RPF जवानावर ब्लेडनं हल्ला केला; रेल्वे तिकिटावरुन प्रसिद्ध अभिनेत्रीची अरेरावी, चालत्या ट्रेनमध्ये गोंधळ
Advertisement

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget