एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : उद्धव ठाकरे यांनी लडाखचे आंदोलक सोनम वांगचुक यांच्या अटकेवरून आणि पाकिस्तानसोबतच्या चर्चेवरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

Uddhav Thackeray Slams Modi Government : हे सरकार आपल्याला रोजगार देत नाही, शिक्षण देत नाही. त्यामुळे हे दळभद्री सरकार आता बदललंच पाहिजे. तुम्ही सर्वांनी आता केवळ कार्यकर्ते न राहता नेते व्हा आणि हे सरकार बदला. आज तुमच्यात जी आग दिसत आहे, ती आग हे सरकार बदलेपर्यंत पेटती राहिली पाहिजे आणि या हुकूमशाही सरकारला तिने भस्म केलं पाहिजे. या लोकांनी तुमचं भवितव्य चोरलं आहे, अशा अत्यंत कडक आणि आक्रमक शब्दांत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.

लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईमध्ये एक आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. त्याचसोबत ठाकरेंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेवरही टीका केली. 

Uddhav Thackeray On Sonam Wangchuk : 'लष्करासाठी काम करणारे वांगचुक देशद्रोही कसे?'

सोनम वांगचुक यांच्या कार्याचा गौरव करत उद्धव ठाकरे म्हणाले की, "सोनम वांगचुक यांनी या देशाला काय दिलं आणि या दळभद्री सरकारने देशाला काय दिलंय, याचा हिशोब एकदा होऊनच जाऊ दे. बर्फामध्ये देशाचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांसाठी वांगचुक यांनी 'सोलर कॅम्प' बनवून दिले. लडाखमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असताना त्या ठिकाणी कृत्रिम 'आइस माउंटेन' ज्यांनी बनवले, आज त्याच सोनम वांगचुक यांना हे सरकार देशद्रोही 
आणि चीनचे हस्तक ठरवत आहे."

Thackeray Target RSS Dattatreya Hosabale : पाकिस्तान चर्चेवरून संघावर निशाणा

पुढे बोलताना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रेय होसबळे आणि मोहन भागवत यांच्या विधानांचा दाखला दिला. "पाकिस्तानबरोबर भारताने चर्चा केली पाहिजे, असं वक्तव्य संघाच्या होसबळे यांनी केलं होतं आणि त्यावर मोहन भागवत यांनीही संमती दर्शवली होती. जे लोक आपल्या सैनिकांच्या जीवावर उठले आहेत, त्या पाकिस्तानसोबत चर्चेसाठी हे तयार आहेत; पण जो व्यक्ती आपल्या लष्करासाठी आणि देशासाठी अहोरात्र काहीतरी करतोय, त्याच्याशी मात्र हे सरकार चर्चेला तयार नाही. आज जे काही देशामध्ये सुरू आहे, ते संघाच्या कल्पनेतील 'हिंदू राष्ट्र' आहे का?" असा थेट प्रश्न त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

Uddhav Thackeray On Anna Hazare : मनमोहन सिंग आणि मोदी सरकारची तुलना

काही वर्षांपूर्वी झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करून देत ठाकरे म्हणाले की, "अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले होते, तेव्हा त्यांना देशभरात मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यावेळी त्यांना कोणीही देशद्रोही किंवा चीनचा हस्तक म्हटले नव्हते. उलट, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी अण्णांशी सन्मानाने चर्चा करण्यासाठी विलासराव देशमुखांना पाठवले होते. मात्र, आजच्या सरकारकडून दडपशाही सुरू आहे."

Thackeray Challenges PM Modi : 'तुमच्या पापाचा कोंबडा लवकरच आरवणार!'

सरकारवर घणाघात करताना उद्धव ठाकरे म्हणाले, "चादरीने तुम्ही जरी वांगचुक यांचे आंदोलन झाकण्याचा प्रयत्न केला, तरी सत्य कधीही लपत नाही. तुमच्या पापांवर आता पांघरूण घालता येणार नाही, तुमचा पापाचा कोंबडा लवकरच आरवणार आहे. मोदी सरकारने हिंमत असेल तर आता निवडणुका जाहीर कराव्यात, आम्ही सर्व ताकदीने लढायला तयार आहोत," असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
Advertisement

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
SBI अधिकाऱ्याने बँक रिलेशनशिप मॅनेजर बायकोसह बहिणीला सुद्धा गोळ्या घालून ठार केलं, स्वत:लाही गोळी घातली; स्टेटसमध्ये लिहिलं, 'मेव्हणा आणि मेव्हणीला सगळं माहीत आहे त्यामुळे...'
Embed widget