एक्स्प्लोर

Rape Case : हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर तर गोव्यात ब्रिटिश महिलेवर अत्याचार

Rape in Hyderabad and Goa : हैदराबादमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. गोव्यामध्ये एका ब्रिटिश महिलेवर अत्याचार घडल्याची घटना समोर आली आहे.

Rape News of Hyderabad and Goa : तेलंगाणाची राजधानी हैदराबाद येथील सामुहिक बलात्कार प्रकरण समोर येऊन नुकतेच काही दिवस झाले आहेत. त्यातच आता पुन्हा आणखी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक गुन्हा रामगोपालपेठ पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. 

रामगोपालपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक सैदुलु यांनी सांगितलं की, 'बालकल्याण समितीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर 23 वर्षीय आरोपीनं अत्याचार केला आहे. आरोपीविरोधात पोक्सो कायदा आणि इतर कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.'

राजेंद्रनगर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल करत म्हटलं आहे की, एका महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाने पीडितेवर थिएटरमध्ये अत्याचार केला होता. पीडित मुलीकडून तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करत त्यांनी रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे.'

'अल्पवयीन मुलांचे संरक्षण करण्यात पोलीस अपयशी'
हैदराबादमधील बलात्काराच्या घटनांवर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे की, हैदराबादमधील घटना दुःखद आहे. अल्पवयीन मुलांना सुरक्षा देण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. या प्रकरणाची दखल घेत मी तेलंगणा पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं होतं. पोलिसांनी पहिल्या गुन्ह्यात 4 आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. आयोग इतर बाबींचीही दखल घेईल.

गोव्यातील आरंबोल समुद्रकिनारी ब्रिटीश महिलेवर अत्याचार
गोव्यातील अरंबोल समुद्रकिनाऱ्याजवळील प्रसिद्ध 'स्वीट लेक' येथे एका ब्रिटिश महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एका 32 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आरोपी जोएल व्हिन्सेंट डिसोझा स्थानिक रहिवासी असून त्याने 2 जून रोजी समुद्रकिनाऱ्यावर विश्रांती घेत असलेल्या एका मध्यमवयीन ब्रिटीश महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पतीसोबत गोव्यात फिरायला आलेल्या पीडित ब्रिटीश महिलेनं सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली. आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

हैदराबादमध्ये 28 मे रोजी एका अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये पाच आरोपींचा समावेश असून तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तीन अल्पवयीन आणि एका आरोपीला अटक करण्यात आली असून पाचव्या फरार आरोपीचा शोध सुरु आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Beed : हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला, बीडमध्ये गावगुंडांकडून कीर्तनकारांना अमानुष मारहाण; लोखंडी रॉड, केबल वायरने हल्ला
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय
धक्कादायक! जालना जिल्ह्यात 19 वर्षीय तरुणाला संपवलं, आरोपी फरार, प्रेम संबंधातून घटना घडल्याचा संशय

व्हिडीओ

Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report
Maharashtra Minsiter On PM Modi Appeal : ईव्ही कार वापरुन अर्थव्यवस्था चार्ज होणार? | Special Report
Politics Over Rahul Gandhi foreign trip : राहुल गांधींचा परदेश दौरा, भाजपचे आरोप | Special Report
Sharad Pawar UNCUT PC : देशात आर्थिक आणीबाणी येणार? पवारांनी सांगितलं भविष्यात काय होणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
जसप्रीत बुमराह कॅप्टन बनला अन् तिलक वर्माकडून मुंबईला विजयाचा तिलक, पंजाबचा सलग पाचवा पराभव
Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित, तब्बल 143 वेळा कॉल, खरातच्या पत्नीच्या नावे गुंतवणूक केल्याचा आरोप
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
तुम्ही मुख्यमंत्री असता महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा राहिला असता; प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
HSRP : एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ, 1 जुलैपासून नियमभंग केल्यास 1 हजार रुपयांचा दंड
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
मुंबईने तिसऱ्यांदा कर्णधार बदलला, सूर्या-हार्दिक बाहेर, कर्णधार म्हणून Jasprit Bumrahच्या नावाची घोषणा
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Video: रुपाली चाकणकरांची 6 तास ईडी चौकशी, बाहेर येताच माध्यमांशी बोलल्या; गुवाटही दौऱ्याबाबतही सांगितलं
Sunetra Pawar : पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
पंतप्रधानांच्या आवाहनाला सुनेत्रा पवार यांच्याकडून हरताळ, चार्टर्ड विमान प्रवासावरून राजकीय चर्चा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
मोठी बातमी! NEET पेपरफुटी, लातूरमधून सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यात
Embed widget