![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Thane Crime News : टिटवाळा हादरलं! रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक
Titwala Rape Case : टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
![Thane Crime News : टिटवाळा हादरलं! रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक Thane Crime News rape on woman near titwala railway station area Thane Maharashtra Thane Crime News : टिटवाळा हादरलं! रेल्वे स्थानक परिसरात महिलेवर अत्याचार, आरोपीला अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/14/ebe4b4d7f6553599534582822ee52f3c1699962896838290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
टिटवाळा, ठाणे : मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) परिसराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. टिटवाळा रेल्वे परिसरात (Titwala Railway Station) एका महिलेवर अत्याचार (rape case) झाला आहे. रेल्वे रुळावरून घरी पायी जात असलेल्या महिलेवर बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. टिटवाळा रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) गुन्हा दाखल करून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी विशाल चव्हाण नावाच्या आरोपीला अटक केली आहे. सोमवारी, 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
पीडित तरुणी शहाड येथील एका खासगी कंपनीत काम करते. सोमवारी रात्री कंपनीतून बाहेर पडल्यानंतर पीडित महिला लोकल ट्रेनने टिटवाळा स्टेशनवर पोहोचली. तिचे घर स्टेशनपासून जवळच असल्याने ती घराच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालली होती आणि ती पतीसोबत मोबाईलवर बोलत होती. यावेळी आरोपींनी तिचा पाठलाग सुरू केला. संधी मिळताच आरोपीने महिलेला बळजबरीने रेल्वे ट्रॅकजवळील झुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. महिलेने त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी गुन्हा करून पळून गेला.
घडलेला सगळा प्रसंग या पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही येऊन पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन टिटवाळा स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी विशालला अवघ्या काही तासात अटक केली.
मात्र, हा सगळा प्रकार रेल्वेच्या हद्दीत घडल्याने पोलिसांनी हा गुन्हा रेल्वे पोलिसांकडे वर्ग करत आरोपीला देखील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल चव्हाण हा पडघा येथील एका खासगी कंपनीत काम करतो. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मनोज पाटील आणि कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पत्नीसोबत फोनवर बोलला म्हणून केली हत्या, पत्नीलाही मारण्यास निघाला पण...
ठाणे: पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याचा राग मनात धरून भिवंडीत एका व्यक्तीने त्याच्या मित्राची हत्या (Bhiwandi Murder) केली. त्यानंतर तो उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) असलेल्या त्याच्या पत्नीलाही मारायला निघाला, पण पोलिसांनी त्याला अटक केली. सुरेंद्र कन्हैय्यालाल सोनकर, वय 40 वर्षे, रा. कामतघर असं आरोपीचं नाव असून भिवंडी पोलिसांनी (Bhiwandi Police) त्याला उत्तर प्रदेशमधून अटक केली.
भिवंडीत अंजुरफाटा रेल्वे स्टेशन रोड येथील निर्जन ठिकाणी झाडाला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह लटकावलेला आढळून आला होता. त्याबाबत नारपोली पोलीस ठाणे येथे अज्ञाताच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना मयत इसमाची ओळख पटली. सद्दाम इसहाक हुसेन कुरेशी, वय 19 वर्षे, रा. कामतघर, असे मयत तरुणाचे नाव आहे.
इतर संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)