एक्स्प्लोर

Ashok Kharat : परतवाड्याप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर, चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? आदिती तटकरे शांत का? सुषमा अंधारेंचा प्रश्नांचा वर्षाव

Sushma Andhare PC : आदिती तटकरेंना ज्यांनी मंत्री केलं त्या अजितदादांसाठी काहीही केलं नाही, मग महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काय करणार? असा टोला सुषमा अंधारे यांनी आदिती तटकरेंना लगावला. 

पुणे : परतवाड्यातील आरोपीच्या घरावर ज्या प्रमाणे बुलडोझर चालवला, त्याचप्रमाणे अशोक खरातच्या फॉर्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार? रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? असे प्रश्न ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारले आहेत. राज्यात महिलांचे शोषण होत असताना महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे अजूनही शांत का? असा प्रश्नही त्यांनी विचारला. या प्रकरणात ज्यांचे ज्यांचे नाव आले आहे त्याच्यावर मुख्यमंत्री कधी कारवाई करणार? असंही सुषमा अंधारे यांनी विचारलं. 

नारी शक्ती बिल नंतर आणा, आधी महिलांना संरक्षण द्या. त्यासाठी चाकणकर, केसरकर आणि एकनाथ शिंदेंवर कारवाई करण्याची धमक गृहखात्याची आहे का? असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला. 

बुलडोझर कधी चालवणार?

सुषमा अंधारे म्हणाल्या की, "ज्या तत्परतेने परतवाडा प्रकरणी आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, तशीच कारवाई अशोक खरातवर कधी करणार? या प्रकरणाशी संबंध आलेल्या रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? या प्रकरणाला एक महिना झाला तरी खरातच्या घरावर बुलडोझर का चालवला जात नाही? तशी कारवाई केली जात नसेल तर त्यांना तटकरे किंवा ठाणेकरांचा वरदहस्त आहे का?"

आदिती तटकरे शांत का?

सुनेत्रा पवार आणि आदिती तटकरे या प्रकरणी कधी बोलणार आहेत? या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी काय जबाबदारी पार पाडली? निवडणुकांपेक्षाही महत्त्वाची गोष्ट ही महिलांची सुरक्षा आहे. त्यासाठी तुम्ही काय करत आहात?  महिलांच्या सुरक्षेवर महिला आणि बालकल्याण मंत्री शांत का?  या खात्याच्या मंत्री म्हणून तुम्ही काय पाठपुरावा केला? तुम्हाला मंत्री करणाऱ्या अजितदादांसाठी तुम्ही काय करत नाही, तिथे तुम्ही महाराष्ट्रासाठी काय करणार?

आदिती तटकरे यांनी या प्रकरणावर एक तरी वाक्य बोलावं. नुसता मंत्रिपद घेऊन शांत बसू नये, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला. 

प्रतिभा चाकणकर म्हणतात की त्यांच्या सह्या बनावट आहेत. पण त्यांना पुढे करून रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? समता पतसंस्थेतील खाती बनावट आहेत असं जर म्हणायचं असेल तर त्याचे संचालक बनावट आहेत का ? प्रतीभा चाकणकर यांना नोटीस आली नव्हती, तर मग त्या पोलिसांना भेटायला का गेल्या होत्या? असे प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारले.

शिंदे-केसरकरांना चौकशीला कधी बोलावणार? 

अशोक खरातचे समोर आलेला सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जर ते खरे असतील तर दीपक केसरकर आणि एकनाथ शिंदे यांना चौकशीला कधी बोलावणार? रुपाली चाकणकर या गजाआड कधी करणार? या प्रश्नांचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
शासकीय नोकरीची थाप मारून लग्न, चार महिन्यांतच संजनाने जीवन संपवलं; माहेरच्यांना वेगळाचं संशय, छत्रपती संभाजीनगर हादरलं!
Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhjinagar :बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
बाळाने जन्मताच जीव सोडला, मात्र नवरात्रीच्या कारणास्तव आई-वडिलांचा स्पर्शास नकार, स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांकडून अंत्यसंस्कार
Mumbai Traffic Update: मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
मुंबईत मंत्री ट्रॅफिकने वैतागले, आदिती तटकरे, जयकुमार गोरे गाडीतून उतरले; कॅबिनेटसाठी चालत पोहोचले
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
Chandrashekhar Bawankule : अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
अनधिकृत बांधकामांच्या दस्त नोंदणीवर बंदी; बावनकुळेंचा मोठा निर्णय, आता अर्जासोबतच्या कागदपत्रांची 7 मुद्द्यांवर होणार क्रॉस चेकिंग
Maval News: मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
मावळच्या इंद्रायणीवर दुष्काळाचं सावट, भात किलोमागे 20 रुपयांनी महागणार! एल निनोच्या संकटाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्याही चिंता वाढली
Imperial Heritage Nalasopara Fire: घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
घरात आग लागली, चारजण इमारतीच्या 14 मजल्यावर 45 मिनिटं लटकले, नालासोपाऱ्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
Embed widget