(Source: ECI/ABP News/ABP Majha)
धावत्या ट्रेनमधून अडीच कोटींच्या सोन्याची तस्करी, मुंबईत चार जणांना अटक
Mumbai Gold Smugglers Arrested: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई युनिटने धावत्या ट्रेनमधून अडीच कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे.
Mumbai Gold Smugglers Arrested: महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) मुंबई युनिटने धावत्या ट्रेनमधून अडीच कोटी रुपयांच्या सोन्याची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. हे चौघे परदेशातून तस्करी करून भारतात आणलेले सोने एका ट्रॉली बॅगमध्ये लपवून दिल्ली (Delhi) येथून मुंबईत (Mumbai) राजधानी एक्स्प्रेस ट्रेनमधून (Rajdhani Express) आणत होते. डीआरआयच्या (Directorate Of Revenue Intelligence ) अधिकाऱ्यांनी त्यांना बोरिवली स्टेशनवर पकडले.
डीआरआयच्या सूत्रांनी सांगितले की, म्यानमार, बर्मा येथून सोन्याची तस्करी होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. यानंतर डीआरआयने त्यांच्यावर नजर ठेवली. हे लोक बोरिवली स्थानकात येताच त्यांना थांबवून पोलिसांनी त्यांच्या ट्रॉली बॅगची तपासणी केली असता त्यांच्याकडे 4.9 किलो सोने सापडले, ज्याची किंमत 2.5 कोटी रुपये आहे. अफशान शेख, मोईनुद्दीन मन्सूरी, अल्ताफ मोहम्मद मेमन आणि अदनान रफिक शेख अशी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, अफशान आणि मोईनुद्दीन यांना म्यानमारमधून सोने भारतात आणण्याचे काम देण्यात आले होते आणि ते सोने घेऊन बोरिवलीला पोहोचताच अल्ताफ आणि अदनान त्यांच्याकडून हे सोने घेणार होते. नंतर ते मुंबईतील झवेरी मार्केटमध्ये हे सोने विकणार होते. परदेशातून सोने भारतात आणण्यासाठी अल्ताफ आणि अदनान यांनी अफशान आणि मोईनुद्दीनला प्रत्येक फेरीसाठी 15,000 रुपये देत होते.
सुमारे 60 ते 70 किलो सोन्याची तस्करी केली
चौकशीत आरोपींनी 10 महिन्यांत 60 ते 70 किलो सोन्याची तस्करी केल्याचे सांगितले. या चार आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. डीआरआयने मास्टरमाईंड म्हणून वर्णन केलेल्या अल्ताफला कोर्टाने 3 दिवसांसाठी डीआरआयच्या कोठडीत तर उर्वरित तीन आरोपींना 14 दिवसांच्या कोठडीत पाठवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Wardha : आर्वीच्या गोल्डमॅन हत्याप्रकरणातील आरोपीच निघाले कारंजा दरोडा प्रकरणातील दरोडेखोर
BMW चं स्पीड चेक करणं इतरांच्या जीवावर, वॅगन R ला धडक, पलटी होऊन फूटपाथवरील चिमुकल्यांचा मृत्यू