Sindhudurg Accident : रस्ता क्रॉस करणाऱ्या 7 वर्षीय मुलीच्या डोक्यावरुन टेम्पोचं मागचं चाक गेलं, सिंधुदुर्गात अंगावर काटा आणणारा अपघात
Sindhudurg Accident : सिंधुदुर्गात रस्ता क्रॉस करत असलेल्या मुलीला टेम्पोने धडक दिलीये, यातच तिचा मृत्यू झालाय.
Sindhudurg Accident : सिंधुदुर्गातील दोडामार्ग झरेबांबर येथे दोडामार्ग ते बेळगाव मुख्य रस्त्यावर भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोने रस्ता क्रॉस करणाऱ्या 7 वर्षीय शाळकरी मुलीला जोरदार धडक दिलीये. यातच तिचा मृत्यू झालाय. श्रीया संदीप गवस (वय 7) असं अपघातात मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे.
रुग्णालयात आणण्यापूर्वी श्रीयाचा दुदैवी मृत्यू
अधिकची माहिती अशी की, श्रीया संदीप गवस या 7 वर्षीय शाळकरी मुलीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने आणि चाक डोक्यावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली. त्या अवस्थेत तिला दोडामार्ग रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वी तिचा दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, मुलीचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला चोप दिला. नागरीकांनी घटना स्थळी गर्दी केली होती. तिलारी घाटातून सुसाट वाहने सोडली जातात. यामुळे संतप्त नागरिकांनी पोलिसांना धारेवर धरले. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले.
चिपळूण गुहागर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सलचा भीषण अपघात
चिपळूण- गुहागर मार्गावर टेम्पो ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. या अपघातामध्ये 13 ते 15 जण जखमी झाल्याची शक्यता आहे. चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जात असताना टायर फुटल्याने बस पलटी झाली. अपघातामध्ये महिलेसह एका पुरुषाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल करण्यात आलंय. चिपळूणमधील घोणसरे येथे ही घटना घडलीये. अपघातग्रस्त बस मुंबईतून गुहागरमध्ये पर्यटक घेऊन जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यातही भीषण अपघात
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यात आज (12) दोन भीषण अपघातांच्या घटना समोर आल्या आहेत. एक घटना सातोना-बीड मार्गावर तर, दुसरी करडी मार्गावर घडली आहे. वरठी पोलीस स्टेशन हद्दीतील सातोना - बीड मार्गावर झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. दरम्यान, अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको केलाय. मृतक करण हा आपल्या बहिणीला महाविद्यालयात सोडून दुचाकीनं गावाकडं परत येत असताना ही घटना घडली आहे.
Malshiras News: राखणदार असतानाही दिवसाढवळ्या उसाच्या फडांना आग, मतदानाच्या दिवसापासून घटना सुरु, माळशिरसमध्ये नेमकं घडतंय काय?#sugarcanecrop #MalshirasNews #Firenews #farmers https://t.co/zqzAZwiWQO
— ABP माझा (@abpmajhatv) December 6, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या