एक्स्प्लोर

Maharashtra Weather Update: दरवर्षीपेक्षा राज्यात यंदा कमी प्रमाणात थंडी; शेतकर्‍यांनाही सतर्कतेचा इशारा, काय म्हणाले हवामान शास्त्रज्ञ?

राज्यभरात यंदाच्या हंगामात थंडी कमी प्रमाणात असणार आहे. विंटर आऊट लुकमध्ये यंदा तीन महिने तापमानात चढ-उतार बघायला मिळणार आहे. अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी दिली आहे.

Maharashtra Weather Update: राज्याच्या विविध भागात पावसानं (Unseasonal Rain) एकच धुमाकूळ घातला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळं शेतकरी चिंतेत आहेत. या पावसाचा फळपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नव्याने स्थापन झालेल्या फडणवीस सरकार समोर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच झालेल्या नुकसानचे आव्हान आहे. नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर आगामी काळातही सतर्क राहण्याचे आदेश भारतीय हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना दिले आहे. 

अशातच या बाबत हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी यावर भाष्य करताना राज्यात पडत असेला पाऊस अवकाळी नसल्याचे म्हटले आहे. पेंगल समुद्री वादळामुळे बाष्पयुक्त वारे पश्चिम महाराष्ट्राकडे वळल्याने काही भागात पाऊस पडतोय. मात्र या पावसाला अवकाळी पाऊस म्हणता येणार नसल्याचे ते म्हणाले.  

यंदाच्या हंगामात राज्यभरात कमी प्रमाणात थंडी 

काही दिवसांपूर्वी पुण्यावर शितवाऱ्यांचा प्रभाव होता, त्यामुळे पुण्यात थंडी वाढली होती. मात्र पेंगल या समुद्री वादळामुळे तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातच नाही तर राज्यभरात यंदाच्या हंगामात थंडी कमी प्रमाणात असणार आहे. विंटर आऊट लुकमध्ये यंदा तीन महिने तापमानात चढ-उतार बघायला मिळणार आहे. साधारण 14 ते 17 अंशापर्यंत तापमान असू शकत. असा अंदाज ही हवामान शास्त्रज्ञ एस डी सानप यांनी व्यक्त केला आहे. 

....तर शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम 

पुढील तीन दिवस पुण्यात तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतरचे तीन दिवस पुण्यात शितवाऱ्याचा प्रभाव जाणवणार आहे आणि थंडीत वाढ होणार आहे. पण दरवर्षीपेक्षा यंदा थंडी कमी प्रमाणात असणार आहे. नेहमीच्या वातावरणापेक्षा काही प्रमाणात वातावरणात बदल झाला तर शेतकऱ्यांच्या पिकांवर परिणाम दिसू लागतो. यंदा देखील या पेंगलमुळे पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकत. असा इशाराही एस डी सानप यांनी दिल आहे. 

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

लातूर जिल्ह्यातील अनेक भागात काल(गुरुवारी) मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी वातावरणात गारठा वाढला आहे. लातूर शहर आणि परिसर देवणी शहर आणि परिसर निलंगा तालुक्यातील काही भाग या ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी आहे.  

लातूर शहरासह जिल्ह्यातील देवणी निलंगा तालुक्यातील काही भागांमध्ये मध्यरात्री अचानक पावसाने हजेरी लावली. मध्यरात्री अचानक आलेल्या पावसामुळे बाहेर असलेल्या लोकांची तारांबळ उडाली. मध्यरात्री अचानक लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि परिसर देवणी परिसर त्याचबरोबर निलंगा तालुक्यातील खरोसा भाग या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. कव्हा, हरंगुळ, खोपेगाव, सारोळा, बाभळगाव या भागातही रिमझिम पावसाची हजेरी होती. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात प्रचंड गारठा वाढला आहे. या पावसामुळे पिकावर रोगराई पडण्याची शक्यता दाट झाली आहे. मागील काही दिवसापासून वातावरणात म्हणावा तसा गारवा जाणवत नव्हता. मात्र मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारठा वाढला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget