एक्स्प्लोर

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांड प्रकरण: आफताबसोबत डेट करणाऱ्या तीन तरुणींची दिल्ली पोलिसांकडून चौकशी

Shraddha Murder Case: आफताब पूनावाला याला डेंटिग अॅपवर भेटलेल्या तीन तरुणींचे जबाब दिल्ली पोलिसांनी वसईत नोंदवले आहेत.

Shraddha Murder Case:  श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा (Shraddha Murder Case) तपास करणारे दिल्ली पोलीस (Delhi Police) वसईत (Vasai) दाखल झाले आहेत. वसईमध्ये दिल्ली पोलिसांनी आफताब आणि श्रद्धा यांचे शेजारी, मित्रपरिवाराची चौकशी केली आहे. त्याशिवाय डेटिंग अॅपवरून आफताबला भेटलेल्या तीन तरुणींची चौकशी दिल्ली पोलिसांनी केली. वसईतील माणिकपूर पोलीस (Vasai Manikpur Police Station) ठाण्यात मंगळवारी ही चौकशी करण्यात आली. श्रद्धासोबत लिव्ह-इन-रिलेशनशीपच्या नात्यापूर्वी आफताबचे याआधीदेखील प्रेमप्रकरणे होती अशी माहिती समोर आली होती. 

दिल्ली आणि वसई पोलिसांनी या चौकशीबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या तीन तरुणी आफताबला पूनावाला याला डेट करणाऱ्या तरुणी असू शकतात. याआधी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, आफताब पूनावाला डेट करत असलेल्या चार पैकी दोन तरुणींचा शोध वसई पोलिसांकडून सुरू होता. 

दिल्ली पोलिसांमधील सूत्रांनी 'मिडे-डे' या वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी चौकशी करण्यात आलेल्या तरुणी या  हत्येच्या आधी आणि नंतरही आफताबच्या संपर्कात होत्या. त्याशिवाय त्यांच्यात फोनवरून संभाषणदेखील झाले असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी तपास करताना या तरुणींची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. दिल्ली पोलिसांनी आफताब पूनावाला याच्या एका मित्राचीदेखील चौकशी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा मित्रदेखील आफताबच्या संपर्कात होता. मात्र, पोलिसांना त्याने समाधानकारक उत्तर दिले नसून आपण फक्त  आफताबसोबत फोनवर गप्पा मारत होतो, असे त्याने म्हटले. 

पोलिसांकडून श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी, कार्यालयातले सहकारी, नातेवाईक असे  अंदाजे 20  हून अधिक लोकांचे जबाब घेतले गेले आहेत. बहुतेक जणांनी त्यांच्या श्रद्धासोबत केलेले चॅट किंवा कॉलबाबतची माहिती आणि पुरावे पोलिसांना दिले आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांकडून आफताबची नार्को चाचणी करण्यात येणार आहे.

दरम्यान, आफताब पूनावाला तपासात पोलिसांना सहकार्य करत नसल्याने दिल्ली पोलिसांकडून डिजिटल पुरावे जमा करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती आहे. कोर्टात हे पुरावे अधिक मदतशीर कसे ठरतील यासाठी पोलिसांकडून चाचपणी सुरू आहे. श्रद्धाच्या हत्येबाबत माहिती गोळा करत असताना पोलिसांना मृतदेहाचे अवशेष गोळा करणे कठीण जात आहे. शिवाय आफताब देखील वारंवार आपले जबाब बदलत आहे. त्यामुळे पोलिसांना पुरावे गोळा करण्यात आणि तपास करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Shraddha Murder: "आफताब मला मारुन टाकेल आणि तुकडे करुन फेकून देईल..." ; श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच पोलिसांना दिलेली माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget