सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना लाच घेताना अटक, शिक्षण संस्थेकडे मागितली होती लाच
Satara Local News Updates : साताराच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवे यांना सांगलीत लाच घेताना अटक करण्यात आली.
Satara Local News Updates : सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवे यांना सांगलीत लाच घेताना अटक करण्यात आली. सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार सपना घाळवेंकडे होता. त्यांनी शिक्षण संस्थेकडे लाच मागितली होती. सांगलीतील समाज कल्याण कार्यालयात लाचलुचपत विभागाने कारवाई करत लाच मागणाऱ्या निरीक्षकलाही ताब्यात घेतले.
सातारच्या समाज कल्याण अधिकारी सपना घाळवेंना सांगलीतील समाज कल्याण कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केलीय.
घाळवेंकडे सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचाही अतिरिक्त कार्यभार होता. सांगलीतील एका शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणार्या धनगर समाजतील विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणार्या अनुदान पोटी लाचेची मागणी करण्यात आली होती. यामध्ये सपना घोळवे बहुजन समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आलीय. सांगलीतील एका शिक्षण संस्थेमध्ये इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणार्या धनगर समाजातील विद्याथ्यांना 59 लाख 40 हजाराचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. याचा पहिला हप्ता म्हणून 29 लाख 70 हजारचा धनादेश देण्यात आला होता. याच्या कमिशन पोटी सपना घोळवे यांनी सहा लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती पाच लाख रुपये देण्याचे ठरले होते. यापैकी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना सपना घोळवे यांना लाचलुचपतने रंगेहात अटक केली. तर हप्ताच्या धनादेश दिल्याबद्दल दहा हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याला देखील अटक करण्यात आलीय. या कारवाईमध्ये मात्र आता एकच खळबळ उडालीय.
याबाबत तक्रारदार असलेल्याची एक शैक्षणिक संस्था आहे. या संस्थेस शासनामार्फत भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमातील नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्यासाठी 59 लाख 40 हजार रुपये अनुदान मंजूर झाले आहे. या अनुदानाचा पहिला हप्ता 29 लाख 70 हजार रुपये शाळेला दिला आहे. पहिला हप्ता दिल्याचा मोबदला म्हणून दहा टक्के व दुसरा हप्ता देण्यासाठी दहा टक्के रक्कम मिळून सहा लाख रुपये लाचेची मागणी घोळवे यांनी केली.त्यांच्याकडे सांगलीत इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदार संस्थेच्या पदाधिकारी यांनी 5 जून रोजी तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केली. त्यामध्ये घोळवे यांनी सहा लाख रुपये लाच मागितली. चर्चेअंती पाच लाख रुपये व त्यानंतर अडीच लाख रुपये लाचेची मागणी करत पहिला हप्ता एक लाख रुपये लगेच घेऊन येण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तत्काळ सामाजिक न्याय भवनमधील इतर मागास बहुजन कल्याण विभागात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून एक लाख रुपये लाच घेताना घोळवे यांना रंगेहाथ पकडले. तर याच कार्यालयातील समाज कल्याण निरीक्षक दीपक पाटील याने तक्रारदाराकडे आश्रमशाळेच्या अनुदानाचा धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून दहा हजार लाचेची मागणी केल्याबद्दल अटक केली.