एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Pune Drug Racket : ड्रग्स मफिया ललित पाटीलला पळून जाण्यात रोझरी स्कूल संचालकाची मदत, विनय अरहानाचा हात

Sasoon Hospital Drug Racket : ड्रग्स मफिया ललित पाटीलला पळून जाण्यात पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचे उघड झालं आहे.

Drug Mafia Lalit Patil : ड्रग्स मफिया ललित पाटील (Lalit Patil) ला पळून जाण्यात पुण्यातील रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याने मदत केल्याचं उघड झालं आहे. पुण्यातील ससून रुग्णालय ड्रग्स रॅकेट (Sasoon Hospital Drug Racket) प्रकरणातील ही नवी अपडेट समोर आली आहे. ससून रुग्णालयातून ड्रॅग्स रॅकेट चालवणारा (Pune Crime News)  ड्रॅग माफिया ललित पाटील पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्यानं प्रचंड खळबळ आहे.  

ललित पाटील कसा पळाला?

ललित पाटील ससुन रुग्णालयातून निसटल्यानंतर आधी एका पंचतारांकित हॉटेलमधे गेला. तिथून रिक्षाने तो सोमवार पेठेत गेला. तिथे दत्ता डोके हा विनय अरहानाचा ड्रायव्हर ललित पाटीलसाठी कार घेऊन हजर होता. त्या कारमधून ललित पाटील पुण्यातील रावेतमधे पोहचला. तिथे पोहचल्यावर दत्ता डोकेने ललित पाटीलला विनय अरहाना याच्या सांगण्यावरून दहा हजार रुपये देखील दिले. ते पैसे घेऊन ललित पाटील आधी मुंबईला आणि तिथून नाशिकला गेला आणि तिथून गायब झाला. 

विनय आणि ललितची ओळख कशी झाली?

ललित पाटील आणि विनय अरहाना या दोघांची ओळख ससुनच्या जिथे कैद्यांवर उपचार केले जातात त्या 16 नंबर वॉर्डमध्ये झाली. त्या ओळखीतून विनय अरहानाने ललित पाटीलला पळून जाण्यास मदत केली. विनय अरहाना हा रोझरी स्कुलचा संचालक असून रोझरी स्कुलच्या इमारतींच्या नूतनीकरणासाठी एका बँकेकडून घेतलेले 46 कोटींचं कर्ज त्याने फॅशन शो आणि सेलिब्रेटींवर खर्च केल्याचा आरोप आहे. या आरोपांखाली अरहानाला अटक करण्यात आली, मात्र आजारपणाचे कारण देत तो ससुनमधे भरती झाला.

पुणे जिल्ह्यातील चाकण भागात अंमली पदार्थांची तस्करी करताना ललित पाटील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) ड्रग्ज रॅकेटचा म्होरक्या ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून पळाल्यामुळे ससूनचे प्रशासन आणि पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. ललित मागील चार महिन्यांपासून ससूनमध्ये उपचार घेत होता. वेगवेगळ्या आजाराची कारणं देत हा उपचार घेत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ससून रुग्णालयात वेगवेगळ्या कारणाने या ललितला आश्रय देत होतं का, असा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Sasoon hospital drug racket : बायको वकील, बसल्याजागी करायचा लाखोंचा व्यवहार; ससूनमधून पळालेल्या ललित पाटीलच्या ड्रग्स रॅकेटची A to Z कहाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget