Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: संतोष देशमुख प्रकरणाची पहिली सुनावणी, वाल्मिक कराड अन् सुदर्शन घुलेच्या वकिलांकडून प्रश्नांची सरबत्ती, सरकारी वकील म्हणाले...
Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली.

Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांच्या हत्या प्रकरणी आज केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात पहिली सुनावणी झाली. या सुनावणीला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील न्यायालयात उपस्थित होते. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व आरोपी व्हीसीद्वारे कोर्टात उपस्थित होते. यावेळी बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्यांच्या सीडीआरची मागणी करण्यात आली. तसेच आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील राहुल मुंडेंनी केला. यानंतर वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी देखील युक्तिवाद केला. 26 मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल, असं सांगण्यात आले. यानंतर न्यायालयाने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 26 मार्चला होणार असल्याचे सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज पहिली सुनावणी, न्यायालयात काय काय घडलं?
आरोपीचे जबाब मिळाले नसल्याचा वकील राहुल मुंडेंचा युक्तिवाद
डिजिटल पुराव्यांचा आरोपपत्रात उल्लेख, सीडीआरची बचाव पक्षाची मागणी
सुनावणीला धनंजय देशमुखही कोर्टात उपस्थित
वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे बाजू मांडली. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे ही कोर्टात उपस्थित होते.
शिवराज देशमुख यांना कोर्टा समोर उभे केले..
शिवराज देशमुख यांनी फिर्याद दिली होती..
संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी शिवराज देशमुख त्यांच्यासोबत होते.
सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडके काय म्हणाले?
- साक्षीदारांचे जवाब चार्जशीमध्ये नाही.
- आरोपीचे जवाब मिळालेले नाहीत.
- जर जवाब घेतले गेले आहेत तर साक्षीदारांचे कलम 164 चे जवाब का दिले गेले नाहीत
आरोपीचे वकील राहुल मुंडे काय म्हणाले?
डिजिटल एविडन्सचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे पण त्याचे व्हिडिओ तसेच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते सीडीआर आम्हाला देण्यात यावेत.
सरकारी वकील काय म्हणाले?
- पुढच्या तारखेला आमचे म्हणणे कोर्टात मांडू...
- सरकारी पक्षाकडून जे द्यायचा आहे तो पुढच्या सुनावणीच्या वेळी देऊ
- 26 मार्चला सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडेल...ही तारीख द्यावी अशी सरकारी वकिलाची मागणी
- साक्षीदार आणि आरोपींचे जवाब मिळण्यासाठी इतका उशीर का? करता असा प्रश्न आरोपीचे वकील विचाराले.
- 26 मार्चला होणार पुढील सुनावणी होणार आहे...
सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडचे वकील काय म्हणाले?
न्यायालयात या कामाचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. त्या दोषारोप पत्रात बरेच कागदपत्रे आहे, ते आरोपींना मिळणं गरजेचं आहे, त्यायबत आज आम्ही मागणी केली आहे, ते पुढच्या सुनावणीमध्ये मिळतील, असं वाल्मिक कराडचे वकील विकास खाडे यांनी सांगितले.
संबंधित बातमी:
संतोष देशमुख प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मार्चला, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

