Satish Bhosale Arrested: बसने प्रयागराजला पोहचला अन् तिकडून सटकण्याची तयारी केली; खोक्या सतीश भोसले जाळ्यात कसा अडकला?
Satish Bhosale Arrested: गेल्या 6 दिवसांपासून सतीश भोसलेचा शोध सुरू होता. अखेर प्रयागराजमधून त्याला आज अटक करण्यात आली. सतीश भोसलेला उद्या बीडमध्ये आणले जाणार आहे.

Satish Bhosale Arrested: बीडमधील भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्याला अटक झालीय. प्रयागराजमधून खोक्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. बीड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत खोक्याला अटक केली. खोक्याची गुंडगिरी जगासमोर आल्यावर खोक्या फरार होता. गेल्या 6 दिवसांपासून सतीश भोसलेचा शोध सुरू होता. अखेर प्रयागराजमधून त्याला आज अटक करण्यात आली. सतीश भोसलेला उद्या बीडमध्ये आणले जाणार आहे.
सतीश भोसले जाळ्यात कसा फसला?
सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहचला होता. प्रयागराजवरून विमानाने पळून जाण्याचा तयारीत सतीश भोसले होता. मात्र बीडचे पोलीस अधीक्षक आणि प्रयागराजचे पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने सतीश भोसलेला प्रयागराज विमानतळावरुन अटक करण्यात आली. सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला आणि त्यावरून लोकेशन ट्रेस केलं गेलं आणि अडकला.
सतीश भोसलेच्या अटकेनंतर सुरेश धस काय म्हणाले?
सतीश भोसले याला अटक झाली, ही अत्यंत चांगली बाब आहे. त्याने चूक केली आहे, त्यासंदर्भात अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई होईल. मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप खोटे आहेत. मी यामध्ये अजिबात हस्तक्षेप केला नाही. मी कधीही कोणत्याही पोलिसाला फोन लावत नाही. सतीश भोसलेने चूक केली तर कारवाई करा, असे मी पूर्वीच म्हटले होते, असे सुरेश धस यांनी म्हटले. सतीश भोसले याच्यावर पोलिसांकडून जी काही कलमं लागली आहेत, त्याप्रमाणे कारवाई होईल, असेही धस यांनी सांगितले.
कोण आहे सतीश भोसले?
सतीश भोसले हा मागील पाच वर्षापासून राजकारणात सक्रिय असून तो शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. त्याच्याकडे भाजपच्या महाराष्ट्र भटके विमुक्त आघाडीचे पद आहे. सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केली आहे. तसेच पारधी समाजासाठी सामाजिक कार्य केले. याआधीही सतीश भोसलेवर गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. अलीकडच्या काळात सुरेश धस यांच्याशी संपर्क आल्याने जवळीक वाढली. सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची ओळख निर्माण झाल्याने परिसरात दबदबा निर्माण झाला आहे.
संबंधित बातमी:
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
खोक्याला प्रयागराजमधून अटक, VIDEO:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

