रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची 1200 कोटी रुपयांची फसवणूक, विदेशी अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची (Reliance Infrastructure) 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात (Vakoli Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Reliance Infrastructure : रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची (Reliance Infrastructure) 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात (Vakoli Police Station) एका विदेशी कंपनीच्या (foreign company) तत्कालीन अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या तत्कालीन उपाध्यक्षांची बनावट स्वाक्षरी करुन त्याद्वारे सिंगापूरमधील अर्बिट्रेशन पिटीशनमध्ये 140.93 दशलक्ष डॉलर्सचा (सुमारे 1200 कोटी रुपयांचा ) दावा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग
दरम्यान, हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. तक्रारीनुसार, रिलायन्स एनर्जी लि. (आताचे रिलायन इन्फ्रास्ट्रक्चर) या कंपनीच्या नावाने सासन प्रकल्पाकरता 26 जून 2008 तारखेचे व बुटीबोरी प्रकल्पाकरता 2 सप्टेंबर 2008 तारखेचे बनावट हमीपत्र तयार करण्यात आले आहे. त्या पत्रावर कंपनीचे तत्कालीन उपाध्यक्षांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. पुढे ते पत्र विदेशी कंपनीने सिंगापूर येथील इंटरनॅशनल अर्बिट्रेशन सेंटर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि. कंपनीविरुद्ध दाखल 1200 कोटी रुपयांच्या दाव्यासाठी दाखल केले आहे. त्याद्वारे फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
चीनच्या बहुद्देशीय कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, या घटनेबाबात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे उपाध्यक्ष नीरज पारेख यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर वाकोला पोलीस ठाण्यात चीनच्या बहुद्देशीय कंपनीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मग ते अति पैशांच अमिष असेल, शेअर मार्केटच्या माध्यमातून मोठा नफा मिळवून देण्याचे सांगून केलेली फसवणूक असेल किंवा गुंतवणुकीतून डबल नफा मिळवून देण्याच अमिष असेल. अशा विविध फसवणुकीच्या घटना वाढताना दिसत आहे. याचा मोठा आर्थिक फटका नागरिकांनी बसत आहे. तसेच सायबर स्पेसचा वाढता वापर आणि डिजिटलायझेशनचा वेग वाढल्याने सायबर गुन्ह्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळं कोणताही व्यवहार करताना किवा गुंतवणूक करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या:
लग्नाळू शेतकरीपुत्रांची लाखो रुपयांना फसवणूक, 8 महिन्यांत 9 मुलांसोबत 'सिमरन'चे लग्न; इथं फसला डाव