एक्स्प्लोर

Ratnagiri Crime News : देवभूमी कोकणात नराधमी कृत्य! रत्नागिरीत दहावीतील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, दोनजण अटकेत

Crime News : रत्नागिरी जिल्ह्यातील कोकरे गावात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Ratnagiri Crime News :  शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार रत्नागिरीमधील (Ratnagiri) कोकरे गावात (Kokare Village) समोर आला आहे. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार (Minor Girl) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला निर्जनस्थळी बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवत दोघांना अटक केली असून पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कोकरे गावातील या धक्कादायक प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात गावातील तरुणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा तपास सावर्डे पोलीस करत असून पीडित अल्पसंख्याक समाजातील असल्याने सामाजिक तणाव हाताळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. प्रकृती गंभीर असल्याने पीडित मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

काही दिवसांपूर्वी आरोपी आणि पीडित मुलीची ओळख झाली. यावेळी दोघांनीही आपले मोबाईल नंबर एक्सचेंज केले होते. आरोपी हा मुंबईमध्ये मंडप डेकोरेटरचे काम करतो. दोनच दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्यावेळी त्याने पीडित मुलीला फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अल्पवयीन असलेल्या मुलीवरती अत्याचार केले. ही घटना गुरुवारची असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून आणखीन तपास सुरू आहे. पीडित मुलीवर ती सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण प्रकरणांमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. एका बंद घराची चावी खिडकीतून मिळवून सदरचा गुन्हा घडलेला आहे. त्यामुळे ज्या घरामध्ये हा प्रकार घडला त्या व्यक्तीचा संबंध याच्याशी काही आहे किंवा नाही? याचा तपास सुरू आहे. ज्यावेळेला ही घटना घडली त्यावेळी या घरामध्ये राहणारी व्यक्ती ही खेड इथे क्रिकेट खेळायला गेलेली होती. त्यामुळे या प्रकरणी आणखी तपास केला जाईल. त्यानंतरच आणखी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गावात संतप्त वातावरण

रत्नागिरीतील कोकरे या गावात ही घटना घडली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचारानंतर गावात संतापाचे वातावरण आहे. गावात शांतता राखण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणाचा तपास सावर्डे पोलीस करत आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Madhuri Dixit : 'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ujjwal Nikam BJP Candidate Loksabha: पूनम महाजन यांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारीPm Narendra Modi Rally Kolhapur : कोल्हापुरात मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोलSharad Pawar : शशिकांत शिंदेंना अटक केली तर संघर्ष उभा करणार, शरद पवारांचा इशारा ABP MajhaUjjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Madhuri Dixit : 'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
'अश्लील'बोलांमुळे माधुरी अडकली होती वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
Embed widget