महाडमध्ये वडिलांच्या बंदुकीतील गोळीने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, अपघात, घात की आत्महत्या, तपासाकडे सर्वांचं लक्ष!
रायगड : महाड शहरातील तांबटआळी परीसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय तरुणाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू झालाय. ही घटना घटना आज (दि.8) दुपारी 1 वाजता घडली.
रायगड : महाड (Mahad) शहरातील तांबटआळी परीसरात राहणाऱ्या दहावीत शिकणाऱ्या एका 15 वर्षीय तरुणाचा बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू झालाय. ही घटना घटना आज (दि.8) दुपारी 1 वाजता घडली. या घटनेत श्रेयस सुनील नगरकर (Sunil Nagarkar) या पंधरा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.
श्रेयस नगरकर हा इयत्ता दहावीत शिकत होता
अधिकची माहिती अशी की, श्रेयस नगरकर हा इयत्ता दहावीत शिकत होता. मात्र बंदुकीतून सुटलेली गोळी ही त्यानेच स्वतःवर चालवली की आणखी काही घटना त्याच्यासोबत घडली असावी, असा मोठा प्रश्न पोलिसांसमोर उभा आहे. या घटनेचा अधिक तपास महाड शहरांतील पोलिस करत आहेत.
शवविच्छेदनानंतर श्रेयसच्या मृत्यूच कारण समोर येणार
महाड शहरातील तांबट आळीतील घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाड शहर हादरले आहे. शवविच्छेदनानंतर श्रेयसच्या मृत्यूच कारण समोर येणार आहे. त्यामुळे त्याची हत्या झालीये, की त्याने आत्महत्या केली याचं कारण पोस्टमॉर्टम नंतरच समोर येणार आहे. आत्तापर्यंत वडीलांच्या लायसनधारी बंदुकीतूनच गोळी सुटून मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
दरम्यान,नातेसंबंधांना लाजवेल अशी एक घटना समोर आली आहे. बिहारमधील भागलपूरच्या नवगचियामध्ये मामीवरच्या प्रेमापोटी भाच्यानं क्रूर कृत्य केल्याचं समोर आलं आहे. मामीवर जीवापाड करणाऱ्या भाच्यानं आपल्या पत्नीची विष पाजून हत्या केली आहे. यानंतर पत्नीनं मृतदेह कोसी नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच, दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमधील नवगचिया पोलिसांना 5 जुलै रोजी जहांगीरपूर बैसी गावातून माहिती मिळाली होती की, गावातील रहिवासी मोहम्मद फयाज यानं पत्नी शबनम खातूनची हत्या करून तिचा मृतदेह कोसी नदीत फेकून दिला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून यासंदर्भात माहिती घेतली. मोहम्मद फयाज यानं त्याच्या मामीसह पत्नीच्या हत्येचा कट रचला. त्यानंतर त्यानं पत्नीला ॲसिड पाजल्याचं तपासात उघड झालं. पत्नीचा विष पिऊन मृत्यू झाल्यानंतर तिनं मृतदेह नदीत फेकून दिला. दरम्यान, पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raosaheb Danve : भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ : रावसाहेब दानवे