Raigad Ceime News : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणालाच मारहाण; पुण्यातील पाच पर्यटकांना अटक
Raigad Ceime News : भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या श्रीवर्धन मधील सलीम धनसार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांना पुण्यातील काही पर्यटकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Raigad Ceime News रायगड : कोकणात फिरण्यासाठी आलेल्या पुण्यातील पर्यटकांच्या वाहनाचा आज सकाळच्या सुमारास अपघात झाला. हा अपघात म्हसळा (Mhasala) दिघी महामार्गावरील घोणसे घाटात घडला. त्यानंतर मात्र या अपघातातील दोन्ही वाहनातील व्यक्तींसोबत शाब्दिक चकमक होत त्यांचे मारमारीत रूपांतर झाले. दरम्यान, दोन गटात झालेले भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या श्रीवर्धन मधील सलीम धनसार आणि त्याच्या सोबत असणाऱ्या मित्रांना पुण्यातील याच पर्यटकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
पाच जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल
या हल्ल्यात सलीम धनसार हा गंभीर जखमी झाल्यानें त्याला पुढील उपचाराकरिता पनवेल येथील एम जी एम रूग्णालयात हलविण्यात आले आहे. तर या मारहाणीत सलीम धनसार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून मारहाण करणाऱ्यांनी घटनास्थळावरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र या पर्यटकांना माणगाव पोलीसांनी पाठलाग करत माणगावमध्ये ताब्यात घेतले. त्यानतंर या पर्यटकांना म्हसळा पोलिसांनी ताब्यात घेऊन यामधील पाच जणांवर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना सद्यस्थितीत म्हसळा पोलिस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुलीचा विनयभंग करणाऱ्या टेलरला जमावाने केली बेदम मारहाण
उल्हासनगर कॅम्प तीन मधील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या कपडे बाजारात एका तरुणीचा टेलरने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यानंतर या टेलरला जमावाने बेदम मारहाण केली आहे. विशेष म्हणजे या मारहाणीच्या वेळी विनयभंग झालेल्या तरुणीने घटनास्थळावरून काढता पाय घेतलाय. उल्हासनगर कॅम्प 3 मध्ये आयकॉनिक अल्टरेशन हे दुकान आहे. या दुकानात एक तरुणी अल्टरेशनला दिलेली जीन्स घ्यायला दुपारी चारच्या सुमारास गेली. ही तरुणी जीन्स ट्रायल करत असताना टेलरने बघितल्याचा आरोप तरुणीने केला आहे.
घटना झाल्यावर तरुणीने बाजूलाच असलेल्या दुकानदाराला घडलेला प्रकार सांगीतला. त्या दुकानात खरेदी करायला आलेल्या खुशी पाटील आणि तिच्या कुटुंबांनी टेलरचे दुकान गाठले. तसेच खुशीच्या कुटुंबियांनी दुकानदाराला रस्त्यावर ओढून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. ही घटना माहिती पडताच उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी पोहोचले.
पोलिसांनी जमावापासून टेलरला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रक्षोभक झालेल्या जमावाने पोलिसांना ही जुमानले नाही. अखेर अतिरिक्त पोलीस बल आल्यानंतर जखमी टेलरला मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. टेलरला मारहाण करणाऱ्या खुशी पाटील आणि तिच्या कुटुंबियांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना कायदेशीर नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर आरोपी टेलर दानिश अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
हे ही वाचा