Pune Swargate Bus Depot Crime News: पुण्याच्या स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार, नराधमाचं CCTV फुटेज समोर, नेमकं काय घडलं?, VIDEO
Pune Swargate Bus Depot Crime News: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Swargate Bus Depot Crime News: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर चक्क बसमध्ये बलात्कार (Pune Swargate Bus Depot Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 26 वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आला. मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे 5.30 वाजता ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय. सदर घटनेच्या दरम्यानचं बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय? (Pune Swargate Bus Depot CCTV Video)
सदर घटनेदरम्यानचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. मात्र या सीसीटीव्हीमध्ये पीडित आणि आरोपी दोघंही दिसत नाहीय. बस ज्या ठिकाणी उभी आहे, त्याठिकाणी खूप अंधार असल्याचं दिसतंय. तसेच आजूबाजूला अनेक बस असल्याचं देखील दिसत आहे. स्वारगेट बस स्थानकाच्या मधल्यामध्ये ही बस उभी असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. बसवर सोलापूर-स्वारगेट अशी पाटी लिहिलेली आहे.
स्वारगेट बस स्थानकांत नेमकं काय घडलं? (What exactly happened at Swargate bus depot)
26 वर्षाची तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती, स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती. एका अनोळखी इसमाने तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं. मात्र माझी एसटी याच ठिकाणी थांबते तिकडे जाणार नाही, असं त्या मुलीने त्या इस्माला सांगितलं. तरुणी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवले. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात असलेल्या एका अंधाराच्या ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती. या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे असं देखील सांगितलं. तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले आणि स्वतः सुद्धा बसमध्ये शिरला. त्याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि त्यानंतर तो तिथून पसार झाला. सदर घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितलेला असून पोलिसांची विविध पथकाकडून आरोपीचा शोध घेतला जातोय.
तरुणीवर अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार-
घटनेमुळे तरुणीला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यामुळे दत्तात्रय गाडे याने अतिप्रसंग केल्यानंतर ही तरुणी त्या बसमधून बाहेर पडली आणि दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती फलटणला आपल्या गावी गेली. तिकडे तिने आपल्या नातेवाईकांना आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकाराची तक्रार पोलिसांत केली. त्यानंतर पोलिसांनी स्वारगेट एसटी आगारातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दत्तात्रय गाडे याची ओळख पटवली. यानंतर पुणे पोलिसांची पथके नराधम दत्तात्रय गाडे याचा शोध घेत आहेत. तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला सोनसाखळी चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाली होती. तो जामिनावर बाहेर असल्याची माहिती समजत आहे.























