Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर विशाल अग्रवाल पसार, पोलिसांची विविध पथकं शोधासाठी रवाना
Pune Porsche Car Accident : पुण्यातील व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ते आता नॉट रिचेबल झाले आहेत.
Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) पसार झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समूहाचे प्रमुख विशाल अग्रवाल हे पोलिसांना सापडत नसून त्यांना शोधण्यासाठी पोलिस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दारुच्या नशेत कार चालवून दुचाकीला धडक दिल्याने एक तरुण आणि एका तरुणीचा शनिवारी मध्यरात्री पुण्यातील कल्याणी नगरमधे मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल हा अल्पवयीन असल्याचे कारण देत न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर करण्यात आला. मात्र अल्पवयीन असूनही त्याला पोर्शे कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर मोटर वाहन अधिनियमाच्या कलम 3, 5 आणि 199 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर आपला अल्पवयीन मुलगा दारू पितो हे ठाऊक असूनही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर बाल न्याय अधिनियमनाच्या कलम 75 आणि 77 अंतर्गत आखणी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलिसांनी विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर मात्र विशाल अग्रवाल हे आता नॉट रीचेबल झाल्याची माहिती आहे. त्यांच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
दोन पब चालकांवर गुन्हा दाखल
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कारचालक मुलाच्या वडीलांना कारणीभूत ठरवलंय. याप्रकरणी कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याला दारु देणाऱ्या दोन पब चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आलीये. तर मुलाला दारु देणारे हॉटेल काझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि मॅनेजर सचिन काटकर त्याचबरोबर हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विशेष वागणूक दिली असेल तर सीसीटीव्ही तपासा, फडणवीसांचे आदेश
पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा आरोप करत आहे. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास, त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही तपासून ते खरे असेल तर तत्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
ही बातमी वाचा: