एक्स्प्लोर

Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेची आरक्षण सोडत जाहीर; दिग्गज नेत्यांचं टेन्शन मिटलं, पण शिंदे गटात गेलेल्यांना दणका, कुणाकुणाला फटका?

Nashik Ward Reservation: नाशिक महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर होताच शहराचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

Nashik Ward Reservation: नाशिक महानगरपालिकेची (Nashik NMC) आरक्षण सोडत (Ward Reservation) जाहीर होताच शहराचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. अपेक्षेप्रमाणे दिग्गज नेत्यांच्या प्रभागांमध्ये फारसा उलथापालथ झालेली नसल्याने माजी महापौर, स्थायी समिती सभापती आणि प्रमुख पक्षपदाधिकारी सुरक्षित राहिले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात गेलेल्या काही नेत्यांना आरक्षणाचा मोठा फटका बसला आहे.

Jagdish Patil Uddhav Nimse: जगदीश पाटील आणि उद्धव निमसे यांचा प्रभाग ‘सुरक्षित’

भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील आणि उद्धव निमसे हे दोघेही वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सध्या तुरुंगात असले तरी, त्यांच्या प्रभागात फारसा बदल झालेला नाही. आरक्षण सोडतीत त्यांचा प्रभाग पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिल्याने त्यांच्या समर्थकांनी दिलासा व्यक्त केला आहे. मात्र, हे दोघे निवडणुकीसाठी अर्ज दाखल करू शकतील का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

Praksh Londhe: प्रकाश लोंढेंना दिलासा

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांना या सोडतीत मोठा दिलासा मिळाला आहे. मागील निवडणुकीत त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण असल्याने त्यांना आपल्या सुनेला उमेदवारी द्यावी लागली होती. यंदा मात्र तोच प्रभाग अनुसूचित जाती पुरुषांसाठी राखीव ठरल्याने लोंढेंच्या पुनरागमनाची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तेही एका गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगात असल्याने निवडणुकीत ते प्रत्यक्ष सहभागी होऊ शकतील का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Shiv Sena: शिंदे गटाला आरक्षणाचा दणका

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात दाखल झालेल्या काही नेत्यांना आरक्षण सोडतीने मोठा धक्का दिला आहे. संतोष गायकवाड, ज्यांनी विलास शिंदे यांच्या सोबत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यांचा प्रभाग महिला आरक्षित ठरल्याने त्यांना आपल्या घरातील महिलेला संधी द्यावी लागणार आहे. तर माजी प्रभाग सभापती योगेश शेवरे, जे मनसेतून शिंदे गटात गेले, त्यांच्या प्रभागावरही महिला आरक्षण लागल्याने त्यांची अडचण वाढली आहे. अनधिकृत होर्डिंग्ज प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, पोलिस कारवाईपासून बचाव करण्यासाठी ते पळ काढत असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या नेत्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळणार का? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Nashik Ward Reservation: महिलांसाठी अर्ध्या जागा आरक्षित

या वर्षीच्या सोडतीत 31 प्रभागांतील एकूण 122 जागांपैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. अनुसूचित जातीसाठी 18, अनुसूचित जमातीसाठी 9, ओबीसींसाठी 32 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 63 जागा निश्चित झाल्या आहेत.

Nashik Ward Reservation: प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे

Seats Reserved for General Category: सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित जागा 

1 ड, 2 ड, 3 ब, 3 क, 3 ड, 4 ड, 5 ब, 5 क, 5 ड, 6 क, 6 ड, 7 ब, 7 क, 7 ड, 8 ड, 9 क, 9 ड, 10 ब, 10 क, 10 ड, 11 ड, 12 क, 12 ड, 13 ब, 13 क, 13 ड, 14 क, 14 ड, 15 ब, 15 क, 16 ड, 17 क, 17 ड, 18 क, 18 ड, 19 क, 20 क, 20 ड, 21 क, 21 ड, 22 क, 22 ड, 23 क, 23 ड, 24 ब, 24 क, 24 ड, 25 ब, 25 क, 25 ड, 26 ब, 26 क, 26 ड, 27 ड, 28 ब, 28 क, 28 ड, 29 ब, 29 क, 29 ड, 30 क, 30 ड, 31 क, 31 ड.

Ward reserved for Scheduled Caste women: अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित प्रभाग

21 अ, 27 अ, 9 अ, 1 अ, 2 अ, 4 अ, 19 अ, 8 अ, 22 अ.

Ward reserved for Scheduled Caste men: अनुसूचित जाती पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

11 अ, 12 अ, 14 अ, 16 अ, 17 अ, 18 अ, 20 अ, 27 अ, 30 अ, 31 अ.

Ward reserved for Scheduled Tribe women: अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित प्रभाग

4 ब, 11 ब, 6 अ, 2 ब, 23 अ.

Ward reserved for Scheduled Tribe men: अनुसूचित जमाती पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

1 ब, 8 ब, 16 ब, 27 ब.

Ward reserved for backward class women of citizens: नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित प्रभाग

3 अ, 23 अ, 13 अ

Ward reserved for backward class men of citizens: नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुषांसाठी आरक्षित प्रभाग

1 क, 2 क, 4 क, 5 अ, 6 ब, 7 अ,  8 क, 9 ब, 10 अ, 11 क, 12 ब, 14 ब, 15 अ, 16 क, 17 ब, 18 ब, 19 ब, 20 ब, 21 ब, 22 ब, 24 अ, 25 अ, 26 अ, 27 क, 28 अ, 29 अ, 30 ब, 31 ब (24 ब या प्रभागात दोन जागा निश्चित करण्यात आल्या असून, एका जागा महिलेसाठी राखीव आहे)

Ward reserved for general category: सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित प्रभाग

1D, 2D, 3B, 3C, 3D, 4D, 5B, 5C, 5D, 6C, 6D, 7B, 7C, 7D, 8D, 9C, 9D, 10B, 10C, 10D, 11D, 12C, 12D, 13B, 13C, 13D, 14C, 14D, 15B, 15C, 16D, 17C, 17D, 18C, 18D, 19C, 20C, 20D, 21C, 21D, 22C, 22D, 23C, 23D, 24B, 24C, 24D, 25B, 25C, 25D, 26B, 26C, 26D, 27D, 28B, 28C, 28D, 29B, 29C, 29D, 30C, 30D, 31C, 31D. 

आणखी वाचा 

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 115 जागांसाठी आरक्षण जाहीर; दोन पुरुष, दोन महिला असल्याने 'कारभारी' खुश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 15 DEC 2025 : ABP Majha
Maharashtra Election Commission PC : पालिका निवडणुकांचे बिगुल वाजणार?, ४ वाजता पत्रकार परिषद
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
Video: ऑस्ट्रेलियन दहशतवादी हल्ल्याचा संशय पाकिस्तानी वंशाच्या बापलेकावर; गन खेचून अनेकांचे जीव वाचवणारा नि:शस्त्र अल अहमद ठरला 'बाजीगर', ट्रम्पकडूनही कडक सॅल्युट
MGNREGA : 'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
'मनरेगा'तून महात्मा गांधींचे नाव हटणार, 'विकसित भारत जी राम जी' नावाने नवे रोजगार हमी विधेयक तयार
Devendra Fadnavis: इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाही; सीएम फडणवीसांचा निर्धार
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
Thane Metro: ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! वर्तुळाकार मेट्रोने प्रवास होणार सुसाट; कसा असणार मार्ग? जाणून घ्या A टू Z माहिती
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Video: सुनेचे कान धरता येत नाहीत, आज अभिषेक नाही; तेजस्वी घोसाळकरांच्या भाजप प्रवेशानंतर सासरे विनोद यांना रडू कोसळले
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Embed widget