Pune Crime News : विकृतीचा कळस! दारुच्या नशेत रस्त्यावरच काढले कपडे अन् थेट फुटपाथवरील महिलेवर...
पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार (Pune rape) केल्याची घटना घडली आहे. डेक्कन पीएमटी बस स्टॉप समोर गुरुवारी (दि.15) रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.
पुणे : अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर (Pune Crime news) अत्याचार केल्याचा प्रकार ताज असतानात पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या जंगली महाराज रोडवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार (Pune rape) केल्याची घटना घडली आहे. डेक्कन पीएमटी बस स्टॉप समोर गुरुवारी (दि.15) रात्री दोनच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे आणि आरोपीवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे महिलाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्यातील डेक्कन हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात अनेक रस्त्यावर फुगे वगरे विकणारे लोक फुटपाथवर राहतात. डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. हा प्रकार लक्षात येताच महिलेने थेट पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीवरुन गोविंद रामा घारोळे या 32 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. ही महिला रात्री पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर झोपल्या होत्या. त्याचवेळी हा नराधम दारुच्या नशेत आला आणि महिलेसोबत जबरदस्तीने बलात्कार केला.
महिला असुरक्षितच!
काही महिन्यांपूर्वीदेखील रस्त्यावर भिक्षा मागून उदरर्निवाह करणाऱ्या महिलेवर नातेवाईकांनीच फूटपाथवर (Footpath) बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या एका महिलेवर नातेवाईकांनीच फूटपाथवर बलात्कार केला होता. त्यामुळे असे प्रकार वाढत असून मुली आणि महिला असुरक्षित असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.
नराधमांना शिक्षा कधी मिळणार?
पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवे प्रकरणं समोर य़ेत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळा आणि बाकी स्तरांवरुन अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र तरीही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणं थांबत नसल्याचं समोर येत आहे. यासोबतच मुलींबरोबर महिलादेखील शहरात असुरक्षित असल्याचं मागील दिवसांमध्ये घटलेल्या काही घटनांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्यात सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अश सगळ्या नराधमांची विकृती ठेचायला हवी, अशा भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केल्या जात आहे.
इतर महत्वाची बातमी-
- Pune News : हिंजवडीत वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या; व्हिडीओ व्हायरल, नागरिकांच्या जीवाशी खेळ?
- Loksabha Election 2024 : लोकसभेची तयारी सुरु; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपाययोजना करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश