एक्स्प्लोर

Pune News : हिंजवडीत वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या; व्हिडीओ व्हायरल, नागरिकांच्या जीवाशी खेळ?

पुण्यात मागील काही दिवसांपासून भयंकर प्रकार समोर येत आहे. एकीकडे डासांचं प्रकरण समोर असतानाच दुसरीकडे वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या सापडल्याचं समोर आलं आहे.

पुणे : पुण्यात मागील काही दिवसांपासून भयंकर (Pune news) प्रकार समोर येत आहे. एकीकडे डासांचं प्रकरण समोर असतानाच दुसरीकडे वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये (Pollution) लाल अळ्या सापडल्याचं समोर आलं आहे.  पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील हा प्रकार आहे. हिंजवडीतील एका रहिवाश्याने ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या दिसत आहे. हा प्रकार पाहून आयटी हबमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. 

वॉटर प्युरिफायरच्या फिल्टर कँडलमध्ये लाल अळ्या सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जयदीप बाफना नावाच्या एक्स या अकांऊटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. 15 फेब्रुवारीला व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापदेखील व्यक्त करत आहे. 

ट्विटमध्ये नेमकं काय आहे?

ही Chironomid larvae आहे, Chironomid एक भाग आहे. ज्याला सामान्यत: प्रौढ अवस्थेत "नॉन-चावणारे मिज" आणि लार्वा अवस्थेत "bloodworms" म्हणतात. हे डास जर वाकड आणि हिंजवडी परिसरातील नदीतून येत असेल तर नदी प्रदुषित झाली आहे. या अळीचा लालरंग हा खराब पाण्याची गुणवत्ता दर्शवतं. हा फक्त एका घरातील प्रश्न नसून 800 फ्लॅटपैकी किमान 20 टक्के घरातील नळाच्या पाण्यात सापडले आहे, हे घातक असल्याचं जयदीप बाफना यांनी ट्विटरवरुन सांगितलं आहे. 

या सगळ्या धोकादायक घटना घडत असताना पुणे महापालिका नदी सुधार प्रकल्पाकडे लक्ष देत आहे. हे प्रोजेक्ट वातावरण खराब करणारे आहे. याकडे मात्र पालिकेने दुर्लक्ष केलं आहे. त्यासोबतच नदीकाठचे आरएफडी, सांडपाणी, ड्रेनेज, कचरा, जलकुंभ, डास, मलेरिया, डेंग्यू व इतर असंख्य समस्यांचा नाश रोखण्यासाठी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र महापालिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे, असा आरोप ट्विटमधून करण्यात आला आहे. 

पुण्यातील हिंजवडी परिसरात पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे. त्यात अनेक सोसायट्यांना पाणी नदी किंवा विहिरीतून दिलं जातं. मात्र या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यातच जानेवारी आणि फेब्रुवारी हा काळ किडकांसाठी पोषक असतो. त्याच्या प्रजननाचा काळ असतो, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. 

इतर महत्वाची बातमी-

Loksabha Election 2024 : लोकसभेची तयारी सुरु; निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपाययोजना करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget