एक्स्प्लोर

Pune Crime News: झटपट श्रीमंत होण्याचे आमिष नडले! बनावट ट्रेडिंग ॲपद्वारे पुण्यातील आयटी व्यावसायिकाला लुटले; दोन आठवड्यांत तब्बल 4 कोटी गायब

Pune Crime News: पुण्यातील 46 वर्षीय आयटी व्यावसायिकाला सायबर भामट्यांनी बनावट शेअर ट्रेडिंग नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल 4.43 कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Pune Crime News: पुण्यातील एका 46 वर्षीय आयटी व्यावसायिकाला (IT Professional) सायबर भामट्यांनी (Cyber Criminals) बनावट शेअर ट्रेडिंग नेटवर्कच्या माध्यमातून तब्बल 4.43 कोटी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित आयटी व्यावसायिकाने पिंपरी-चिंचवड सायबर विभागाकडे (Pimpri-Chinchwad Cyber Department) तक्रार दिली असून, पोलिसांनी अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Pune Crime News: नामांकित आंतरराष्ट्रीय बँकेच्या नावाने व्हॉट्सॲप ग्रुप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यावसायिक सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून सायबर चोरट्यांच्या संपर्कात आला होता. त्या पोस्टवरील लिंकवर क्लिक केल्यानंतर तो एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये (WhatsApp Group) सहभागी झाला. हा ग्रुप एका नामांकित आंतरराष्ट्रीय बँकेच्या (International Bank) नावाने चालवला जात होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये.

Pune Crime News: गुंतवणूक तज्ज्ञ 'मैरा' आणि खोटे स्क्रीनशॉट्स

या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये दररोज सकाळी ऑनलाइन सत्रांचे (Online Sessions) आयोजन केले जात होते. त्यामध्ये शेअर बाजाराची माहिती, गुंतवणुकीच्या रणनीती आणि अधिक नफा मिळवून देणाऱ्या शेअर्सविषयी मार्गदर्शन केले जात होते. 'मैरा' नावाची एक महिला या ग्रुपची मुख्य ॲडमिन (Group Admin) होती. ती स्वतःला मोठी गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून सादर करत असे. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी या ग्रुपमध्ये इतर सदस्यांनी मोठा नफा कमावल्याचे कथित स्क्रीनशॉट्स आणि खोटे पुरावे रोज शेअर केले जात होते.

Pune Crime News: दोन आठवड्यांत 4.43 कोटींची गुंतवणूक

ग्रुपमधील वाढता नफा पाहून पीडित व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर त्याला एका लिंकद्वारे बनावट ट्रेडिंग ॲप (Fake Trading App) डाऊनलोड करण्यास आणि त्यावर गुंतवणूक खाते (Investment Account) उघडण्यास सांगण्यात आले. या डिजिटल ॲपमध्ये गुंतवलेल्या रकमेवर झपाट्याने वाढणारा नफा दाखवण्यात येत होता. या अमिषाला बळी पडून पीडिताने अवघ्या दोन आठवड्यांच्या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यांवर विविध व्यवहारांद्वारे तब्बल 4.43 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.

Pune Crime News: अशी उघडकीस आली फसवणूक

काही दिवसांनी जेव्हा पीडित व्यावसायिकाने या ॲपमधून आपले पैसे आणि कमावलेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला तांत्रिक अडचणी दाखवण्यात आल्या. आणखी पैशांची मागणी केल्यावर त्याला संशय आला. त्याने तपास केला असता, ते संपूर्ण नेटवर्क आणि ट्रेडिंग ॲप बनावट असल्याचे उघड झाले आणि आपली फसवणूक (Cyber Fraud) झाल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, नागरिकांनी अशा कोणत्याही अनोळखी व्हॉट्सॲप ग्रुप किंवा बनावट ॲप्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget