एक्स्प्लोर

Pune Crime News: अंगावर खाकी, खांद्यावर स्टार अन् दाखवत होती रुबाब; पुण्यात तोतया 'लेडी सिंघम'चा पर्दाफाश, नेमकं काय घडलं?

Pune Crime News: अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका 25 वर्षीय तोतया 'लेडी सिंघम'ला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Pune Crime News: अंगावर खाकी गणवेश आणि खांद्यावर स्टार लावून सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब दाखवणाऱ्या एका 25 वर्षीय तोतया 'लेडी सिंघम'ला पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या (Lashkar Police Station) पथकाने कॅम्प परिसरात शनिवारी (6 जून) ही धडक कारवाई केली आहे.

या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीचे नाव समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय 25 वर्षे) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिनाचे पोलीस दलात भरती होऊन पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते, मात्र ते भंगले होते. सध्या ती एका खाजगी कंपनीत (Private Company) नोकरी करत होती.

Pune Crime News: नेमकी घटना काय?

शनिवारी 6 जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (Police Sub-Inspector) महेश शिंदे हे आपल्या पथकासह कॅम्प परिसरात गस्तीवर होते. दरम्यान, त्यांना एका नामांकित खाजगी क्लिनिकच्या (Private Clinic) बाहेर एक महिला पोलिसाच्या वर्दीत उभी असलेली दिसली. तिच्या खांद्यावर पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे स्टार्स होते. मात्र, तिच्या हालचाली आणि वावर संशयास्पद वाटल्याने पीएसआय महेश शिंदे यांना संशय आला.

Pune Crime News: चौकशीत झाली बोलती बंद

संशय बळावल्याने पीएसआय शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या महिलेची चौकशी केली. "तुम्ही कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात? तुमचे ओळखपत्र दाखवा," असे पोलिसी भाषेत प्रश्न विचारताच संबंधित महिलेची बोलती बंद झाली. ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. अखेर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, ती तोतया पोलीस असल्याचे निष्पन्न झाले.

Pune Crime News: वर्दी घालण्यामागचे धक्कादायक कारण

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी समिना हिला कॅम्प परिसरातील एका नामांकित क्लिनिकमध्ये उपचारासाठी डॉक्टरांची वेळ हवी होती. मात्र, गर्दीमुळे किंवा इतर कारणांमुळे तिला अपॉइंटमेंट मिळत नव्हती. त्यामुळे तिने थेट पोलिसांचा गणवेश परिधान केला आणि क्लिनिकमधील रिसेप्शनिस्ट (Receptionist) तसेच इतर लोकांवर आपण पोलीस अधिकारी असल्याचा दबाव टाकून लवकर अपॉइंटमेंट मिळवण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लष्कर पोलिसांनी आरोपी समिना इनामदार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तिला अटक केली असून, तिने यापूर्वी अशा प्रकारे कोणाची फसवणूक केली आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, लक्झरी बसचा चेंदामेंदा, प्रवासी बसमध्येच अडकले

शिवानी पांढरे
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli:'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मुंबईच्या कांदिवलीत धक्कादायक घटना! प्रेम प्रकरणातून 17 वर्षीय तरुणीला संपवंल, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
उसाच्या शेतात गांजाची लागवड, 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, बीडच्या चकलंबा पोलिसांची कारवाई 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: 64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
64 तास उलटले, अजूनही 8 जण ढिगाऱ्याखाली; अत्याधुनिक कटरच्या मशनरीने इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पाडला, आतापर्यंत काय काय घडलं?
Dombivli: 'मला मारू नका...', मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
'मला मारू नका.. मारू नका...' मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिला डॉक्टरच्या मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
Embed widget