(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime : ब्रेकअप झालं म्हणून विकृतीचा कळस! व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला गर्लफ्रेंडचा नग्न फोटो; पुण्यातील धक्कादायक प्रकार
pune crime news : प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं.
Pune Crime nesws : ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी (Pune Crime) शिरूरमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवेंद्र धरमचंद फुलपगार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर देवेंद्रनं त्याच्या प्रेयसीला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे देवेंद्रनं प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
'गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव टाकला'
या सगळ्या प्रकरणाची तक्रार तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते.
अल्पवयीन मुलीला ॲसिड टाकून जीवे मारण्याची धमकी
आजच घडलेल्या दुसऱ्या घडनेच एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील पाषाण परिसरातील एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करायला गेली असता अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला अॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. माझी झाली नाही तर कुणाचीच होऊ देणार नाही, असं म्हणत तिला धमकवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
'तरुणांमधील इर्षा वाढत आहे; तज्ञांचं मत'
सध्या सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. त्यात रोज नवे प्रकरणं बाहेर येताना दिसतात. तरुणांचा वाढता सोशल मीडियाचा वापर आणि सध्या आजूबाजूला असलेलं प्रत्येक गोष्टीत तुलनात्मक वातावरण हे या गुन्ह्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. अनेक मुलांवर सोशल मीडियामुळे प्रभाव पडला आहे. सोशल मीडियावर जे बघतील तेच करण्याची इच्छा निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे हेवा, इर्षा, एकमेकांशी तुलना करण्याचं प्रमाण वाढत आहे. मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर त्यातून गुन्हा घडण्याची शक्यता असते. यात मानसिकतेतून हे प्रकार घडत असल्याचं मानस शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या श्वेता येवले यांनी सांगितलं आहे.
ही बातमी देखील वाचा