एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mumbai Bank Scam : 'छळ मांडण्याच्या दृष्टीने सरकारच्या दबावाखाली पोलिसांकडून चौकशी', प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप

Pravin Darekar on Mumbai Bank Scam : भाजप नेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक बोगस मजूर प्रकरणात आज दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. दरेकर यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली.

Pravin Darekar on Mumbai Bank Scam : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मुंबई बँक (Mumbai Bank) बोगस मजूर प्रकरणात आज दुसऱ्यांदा पोलीस चौकशी झाली. दरेकर यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. छळवाद मांडण्याच्या दृष्टीने सरकारच्या दबावाखाली पोलिसांकडून चौकशी करण्यात आली, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे. आमच्यावर कार्यकर्ता म्हणून कायद्याचे पालन करण्याचे संस्कार असल्यामुले आम्ही पहिल्या दिवसापासून पोलीस तपासात सहकार्याची भूमिका घेतली आहे. पहिल्या दिवशी चार तास चौकशी झाली. आजही तीन-चार चौकशी झाली.' यानंतरही गरज पडल्यास चौकशीसाठी हजेरी लावणार असल्याचं दरेकरांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, पोलीस कस्टडीची मागणी कशासाठी असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. यामागचा केवळ उद्देश हा खोटी एफआयआर दाखल करुन छळवाद मांडण्याचा आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. यावेळी दरेकर यांनी शिवसेना खासदार संजया राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. 'आम्ही संजय राऊतांसारखा आक्रस्थळेपणा करणार नाही', असं म्हणत दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपण अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. दरेकरांनी सांगितलं की, ''विरोधकांनी एकत्रितपणे हातमिळवणी करून केलेलं हे षड्यंत्र आहे. मी नाना पटोले, भाई जगताप आणि धनंजय शिंदे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. या संदर्भातील पत्र त्या तिघांनाही पाठवणार आहे. कारण मुंबई बँकेचा नफा 15 कोटी असून आणि दोन हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या प्रसिद्धीसाठी एखाद्याची बदनामी करणं योग्य नाही.''

यापूर्वीच्या चौकशीत काय झालं?
4 एप्रिल रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये त्यांची तीन तास चौकशी करण्यात आली होती. दुपारी 12 वाजता सुरु झालेली चौकशी दुपारी 3 वाजता संपली. "पोलिसांनी पाहिजे असलेली सगळी माहिती दिली. पण पोलिसांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याचं प्रत्येक क्षणी जाणवत होतं," अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी चौकशीनंतर माध्यमांशी संवाद साधताना दिली. तसंच पोलिसांनी अनेक वेळा उलटसुलट आणि तेच तेच प्रश्न विचारुन भंडावून सोडण्याचा प्रयत्न केला. शिवाय चौकशी सुरु असताना पोलीस अधिकाऱ्यांना सहा-सात वेळा फोन आले, पण कोणाचे फोन आले ते कळलं नाही, असंही दरेकर यांनी म्हटलं होतं. 

काय आहे प्रकरण?
प्रवीण दरेकर यांची मुंबै बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली होती. मुंबै बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. परंतु सहकार विभागाने प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवलं. दरेकर 1997 पासून मुंबै बँकेवर मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून निवडून येत आहेत. पण मजूर नसतानाही निवडणूक लढवून प्रवीण दरेकर यांनी बँकेच्या हजारो ठेवीदारांची आणि सरकारची फसवणूक केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली. मुंबै बँकेत कोट्यवधीचा घोटाळा झाला असून सहकार कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah - Vinod Tawde Meet: अमित शाह-विनोद तावडेंच्या भेटीची इनसाईड स्टोरीABP Majha Headlines :  8 AM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  28  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 28 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus : टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
टीम इंडियाची स्टार खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बाहेर, BCCI ने ताबडतोब बदलीची केली घोषणा....
Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
लॉजिस्टीक, ईव्ही व पायाभूत क्षेत्रात नोकरीच्या संध्या; कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये नामी संधी, प्रोफाईल ठेवा तयार
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
विधानसभेतही घराणेशाहीचा बोलबाला, भाजपने उभे केले सर्वाधिक उमेदवार; पवारांची राष्ट्रवादीही पुढे, किती झाले विजयी?
Who Is Jaya Kishori : जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
जया किशोरींचं खरं नाव, शिक्षण माहीत आहे का? हातात दोन लाखांची चमड्याची बॅग दिसल्याने झाल्या होत्या ट्रोल
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
तुमच्या बापाच्या पापामुळे माझं मताधिक्य घटलं,तटकरे-थोरवे वाद चिघळला; शिंदेंच्या आमदाराचा पलटवार
Mohammed Siraj : डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
डीएसपी मोहम्मद सिराजला अखेर 'ती' मिळाली? कधीच लाईक न करणाऱ्याने तिचाच फोटो लाईक केला अन् भूवया उंचावल्या!
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
रोहित पवार म्हणाले दादांना मुख्यमंत्री करा; फुकटचा सल्ला नको, काकाचा पलटवार, संपर्कातील आमदारांबाबतही भाष्य
Embed widget