Coronavirus Cases Today : देशात कोरोना रुग्णांच्या मृत्यूमध्ये मोठी घट, गेल्या 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, नवीन 929 कोरोना रुग्णांची नोंद
Coronavirus Cases Today in India : गेल्या 24 तासांत देशात 929 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाला असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे.
Coronavirus Cases Today in India : आज भारतात कोरोना विषाणूच्या नवीन रुग्णांमध्ये आणि मृत्यूंमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 929 नवीन रुग्ण आढळले असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे 1054 रुग्ण नोंदवले गेले आणि 29 जणांचा मृत्यू झाला. जाणून घ्या देशातील कोरोनाची सध्याची परिस्थिती काय आहे.
सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 58 इतकी कमी झाली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 11 हजार 58 इतकी झाली आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 691 इतकी झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 3 हजार 383 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
रविवारी 1 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
याआधी रविवारी भारतात एकाच दिवसात कोरोनाचे 1 हजार 54 नवीन रुग्ण आढळले होते आणि 29 जणांचा मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, 7 ऑगस्ट 2020 रोजी देशातील संक्रमित लोकांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि 5 सप्टेंबर 2020 रोजी 40 लाखांहून अधिक झाली होती. संसर्गाची एकूण प्रकरणे 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 सप्टेंबर 2020 रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर 2020 रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांपर्यंत पोहोचली होती.
देशात 19 डिसेंबर 2020 रोजी या कोरोना रुग्णांनी एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या 20 दशलक्ष आणि 23 जून 2021 रोजी ती 30 दशलक्ष पार केली होती. यावर्षी 26 जानेवारीला कोरोनाबाधितांची संख्या चार कोटींच्या पुढे गेली होती. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांपैकी 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण इतर आजारांनीही ग्रस्त होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- PM Modi Biden Meeting : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्यात बैठक, दक्षिण आशियासह 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा
- Petrol-Diesle Price : देशात इंधन दरवाढीचा भडका! आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुमच्या शहरांतील दर काय?
- Viral Video : धक्कादायक! इमर्जन्सी लँडिंग दरम्यान विमानाचे दोन तुकडे, तुम्ही व्हिडीओ पाहिला का?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha