एक्स्प्लोर

दगाफटका टाळण्यासाठी पोलिसांनी दाऊद शेखला रात्रीच्यावेळी कोर्टात नेलं, उरणचं लोकेशन बदलून ऐनवेळी पनवेलला वळले

Uran Crime Case : यशश्री शिंदे या 22 वर्षांच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे दाऊद शेखनं हत्या केली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी दाऊद शेखचं नाव घेतलं आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवत दाऊचा शोध सुरू केला.

Uran Crime Case : नवी मुंबई : उरणमधील (Uran Case) तरुणीच्या हत्येनं संपूर्ण देश हादरला आहे. 22 वर्षांच्या यशश्री शिंदेच्या  शरीराची विटंबना करून तिला अत्यंत क्रूर पद्धतीनं मारण्यात आलं. त्यानंतर फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकातून दाऊद शेखला (Dawood Shaikh) ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला मुंबईत आणून रिमांडसाठी त्याला पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाकडून आरोपी दाऊदला 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. पण, ऐनववेळी पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर हजर करण्याची वेळ बदलली. तसेच, त्याला उरण कोर्टात हजर केलं जाणार होतं. पण, रात्रीच्या वेळी आरोपीला पनवेल कोर्टात हजर करण्यात आलं. 

यशश्री शिंदे या 22 वर्षांच्या तरुणीची अत्यंत क्रूरपणे दाऊद शेखनं हत्या केली. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी दाऊद शेखचं नाव घेतलं आणि पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगानं फिरवत दाऊचा शोध सुरू केला. दाऊदच्या मुसक्या आवळल्या. कर्नाटकातून त्याला मुंबईत आणलं खरं, पण त्याला कोर्टात हजर करण्याचं सर्वात मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. आरोपीनं केलेल्या कृत्यामुळे उरणमधील वातावरण तंग आहे. यापूर्वीच यशश्री शिंदेच्या निषेधार्थ संतप्त नागरिकांनी उरणमध्ये मोर्चा काढला होता. एकंदरीत परिस्थिती पाहाता पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर हजर करण्याच्या वेळेत अचानक बदल केला आणि त्याला रात्री कोर्टासमोर हजर करण्यात आलं. आरोपीला रात्री कर्नाटकातून मुंबईत आणलं गेलं. सुरुवातीला उरण कोर्टात हजर केलं जाणार होतं. मात्र, रात्रीच पोलिसांनी आरोपीला पनवेल कोर्टासमोर हजर करण्यात आलं. 

आरोपीला कर्नाटकातून मुंबईत आणल्यानंतर पोलिसांकडून त्याला आज (बुधवारी) उरण कोर्टात हजर केलं जाणार होतं. पण, यशश्रीच्या हत्येनंतर उरणमधील वातावरण फारच चिघळलं आहे. आरोपीला फाशी देण्यासाठी संतप्त नागरिकांनी मोर्चादेखील काढला होता. एकंदरीत वातावरण पाहून पोलिसांनी सावध भूमिका घेतली. पोलीसांनी आरोपी दाऊद शेखला उरण कोर्टात हजर न करता पनवेल कोर्टासमोर हजर केलं. आरोपीला रात्री आणल्या नंतरच रात्रीच्या वेळी पनवेल कोर्टात नेण्यात आलं होतं. त्यानंतर आरोपीची कसून चौकशी करण्यासाठी कोर्टानं त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अशातच आता आरोपीनं हत्या का केली? हत्या करण्यात अजून कोणाचा हात आहे का? या सर्व गोष्टींचा कसून तपास करण्यासाठी त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.             

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amaravati Textiles Park :उद्या अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन, मोदींच्या हस्ते उद्या ई-भूमिपूजनRatnagiri Khed Case : स्वप्नातील गोष्ट खरी ठरली कोकणातल्या खेडमधील प्रकारMNs Worli Vision : मनसेकडून व्हिजन वरळी कार्यक्रमाचं नियोजन, आदित्य ठाकरेंनाही निमंत्रण देणारदुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 19 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget