एक्स्प्लोर

Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर आत्महत्येचा तपास SIT करणार, महिला IPS अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Phaltan Doctor Suicide News : महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.

मुंबई : फलटणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या (Phaltan Doctor Suicide) प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वी फलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. या प्रकरणात तिने हातावर सुसाईड नोट लिहिल्याचं समोर आलं. तसेच आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याची तिची तक्रारही समोर आली होती.

या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे दोन पीए, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्यावर आरोप करण्यात आला. गोपाळ बदनेने आपल्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप महिला डॉक्टरने केला. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव आल्याची तक्रारही तिने केली होती. 

Phaltan Doctor Suicide News : एसआयटी चौकशीची मागणी

या प्रकरणात अनेक नावांचा समावेश असल्याने, त्याची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी सातत्याने लावून धरली. सातारा पोलिसांनी याची चौकशी केली तर त्यांच्यावर दबाव राहू शकतो, त्यामुळे एसआयटी चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत होती.

शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांवर आरोपांची राळ उठवली. या प्रकरणात त्यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच महिला डॉक्टरची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा दावा करत त्यांनी एसआयटी चौकशीच मागणी केली होती.  त्यानंतर आता या प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाणार आहे. 

Phaltan Doctor Suicide SIT : महिला IPS अधिकाऱ्याची एसआयटी

फलटण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. 

या प्रकरणी राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र या प्रकरणातील इतर दोन आरोपींशी झालेले तिचे चॅट समोर आले तर एक गंभीर ट्रँगल समोर येऊ शकतो. तो लोकांसमोर आणण्यासारखा नसल्याने पोलीस शांत असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले. 

ही बातमी वाचा :

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Naresh Mhaske Coffee with Kaushik : मुंबईत महापौर कुणाचा? खासदार नरेश म्हस्के यांचा खळबळजनक पॉडकास्ट
Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget