Jayakumar Gore : त्या भगिनीचा आदर करतो, मात्र मोबाईल चॅटिंगवरुन भयानक ट्रँगल, तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही; फलटण प्रकरणावर जयकुमार गोरेंचा दावा
Phaltan Doctor Suicide News : फलटण प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप मंत्री जयकुमार गोरे यांनी केला. या प्रकरणाची वस्तुस्थिती वेगळी असून ती समोर आणण्यासारखी नसल्याचं ते म्हणाले.

सोलापूर : फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवरून (Phaltan Doctor Suicide) जोरदार राजकारण पेटलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांचे नाव असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात आला. विरोधकांच्या या आरोपांना आता राज्याचे मंत्री जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी उत्तर दिलं. आम्ही त्या भगिनीचा आदर करतो, मात्र मोबाईल चॅटिंगवरून जो ट्रँगल समोर आला आहे तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही. त्यामुळे कुणीही यावर राजकारण करू नये असं जयकुमार गोरे म्हणाले. या प्रकरणाचा तपास सुरू असून न्यायालय आरोपींना शिक्षा देईल असंही ते म्हणाले.
डॉक्टर महिलेला न्याय मिळाला पाहिजे, त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य ते निर्देश दिले आहेत. पण विरोधकांकडून सातत्याने या तपास यंत्रणावर शंका उपस्थित करण्याचं काम सुरू आहे असं गोरे म्हणाले. या घटनेमध्ये सर्व पुरावे समोर असून त्या आधारे तपास होईल आणि आरोपींना शिक्षा मिळेल असंही ते म्हणाले
Jayakumar Gore On Phaltan Case : तिन्ही मोबाईल चॅटिंगमधून वेगळाच अँगल
या प्रकरणात मृत्यू पावलेली संपदा मुंडे आणि दोन आरोपी यांचे मोबाईल पाहिल्यानंतर परिस्थिती खूप गंभीर वेगळी असल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला. तिन्ही मोबाईल बघितल्यानंतर जो ट्रँगल समोर येत आहे तो खूप भयानक आहे आणि ती परिस्थिती लोकांसमोर आणण्यासारखा नाही. आता या मृत्यूवर सुरू असलेले राजकारण थांबवावे आणि वस्तूदर्शक सुरू असलेला तपास होऊन न्यायालयातून आरोपींना शिक्षा मिळू दे असं जयकुमार गोरे म्हणाले.
संपदा मुंडे हिला न्याय मिळेल, न्यायालय यातील आरोपींना शिक्षा सुनावेल. मात्र तिच्या मृत्यूवरून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांनी असले काम बंद करावे असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणांशी बोलून आणि सविस्तर माहिती घेऊन क्लीन चीट दिली. मात्र कोणावरही आरोप करण्याचे लायसन्स तुम्हाला कोणी दिले असा सवालही जयकुमार गोरे यांनी केला.
Phaltan Doctor Suicide News : पुराव्यांच्या आधारे चौकशी सुरू
फलटण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आहे, तिन्ही मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कधी हस्ताक्षर तिचे नसल्याचे आरोप होतात, मग कुटुंबीय हे हस्ताक्षर तिचेच असल्याचे सांगतात. या जप्त केलेल्या तिन्ही मोबाईल मधील चॅटिंग बघितलं तर परिस्थिती खूप वेगळी आहे. आपण मृत भगिनीचा आदर करतो आणि त्यामुळेच पोलीस ही वस्तुस्थिती समोर आणत नाहीत. मात्र याचा गैरफायदा घेत काही लोकं घाणेरडे राजकारण करत आहेत.
Jayakumar Gore On Ramraje Nimbalkar : रामराजे निंबाळकरांना टोला
वस्तुस्थिती सोडून संपदा मुंडे हिच्या मृत्यूचे राजकारण करीत तिसऱ्याच कोणाचे तरी नाव घेत आकांडतांडव करण्याचे काम स्थानिक नेते करीत आहेत. संपदाच्या मृत्यूच्या अडून आपले राजकीय पुनर्वसन होईल अशी भोळीभाबडी अशा तुम्ही ठेवत असाल तर ते चुकीचे आहे. जनतेने तुम्हाला 40 वर्षे पाहिले आहे असा टोला जयकुमार गोरे यांनी रामराजे निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला.
ही बातमी वाचा:
























