एक्स्प्लोर

परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओही काढला

परभणी सुन्न! झाडाखाली मुलाशी गप्पा मारताना अचानक 6 जण आले, तरुणीसोबत अनर्थ घडला..नराधमांनी व्हिडिओ काढला

Parbhani Crime News: परभणीतील जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात 14 ऑक्टोबर रोजी एका गंभीर घटनेची नोंद झालीय. या घटनेने संपूर्ण परभणी जिल्हा सुन्न झालाय. झाडाखाली गप्पा मारत बसलेल्या तरुणीजवळ अचानक 6 जणआले. तिच्यासोबत असलेल्या तरुणाला पकडून ठेवलं त्यातील 3 जणांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला व या घटनेचा व्हिडिओ ही चित्रित केल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत 6  नराधमांना अटक केली आहे.  (Parbhani Crime)

नेमका प्रकार काय?

घटनेच्या तपासानुसार, 14 ऑक्टोबर रोजी तरुणी आणि तिचा मित्र झाडाखाली बसून गप्पा मारत होते. यावेळी करण, शेषेराव, साबेर, मुन्या, अर्जुन आणि लखन हे 6  जण अचानक त्या ठिकाणी आले. अर्जुन आणि लखन यांनी तरुणाला पकडून ठेवले, तर करण, शेषेराव आणि साबेर यांनी तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. या घटनेचा व्हिडिओ काढला. घटना समजताच जिंतूर पोलिसांनी त्वरित कारवाई सुरू केली. 14 ऑक्टोबर रोजी ही घटना परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी संस्थान इटोली परिसरात घडली असून या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी सतर्कता बाळगत पीडित तरुणीला विश्वासात घेवून गुन्हा दाखल केला आणि 6  आरोपींना अटक केली आहे.. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी मंदिर संस्थात इटोली शिवारात हा संतापजनक प्रकार घडलाय.

या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता (IPC) 2023 कलम 376(1), 126(1), 310 आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 कलम 66(इ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अर्जुन दत्तराव बटकुले, शेख साबेर शेख सत्तार, शेषराव दत्तराव शेवाळे यांच्यासह अन्य तिघांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परभणीत मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तपास सुरू ठेवला असून, व्हिडिओ आणि इतर पुराव्यांच्या आधारे सखोल अभ्यास केला जात आहे.

पालकमंत्री मेघना बोर्डीकरांची प्रतिक्रिया 

भोगाव देवीच्या समोर जाताना असा एक जंगल एरिया आहे आणि तिकडे हे दोघं तिकडे गेले होते . ह्या परिस्थितीचा फायदा घेत पाच सहा मुलांनी अत्याचार केलेला आहे . त्यांना तातडीने पकडण्यात आलेला आहे . आणि धाक बसेल अशीच शिक्षा होईल . परंतु, मी जे मुला मुलींना पण सांगू इच्छिते,  कोणीच जात नाही येत नाही अशा ठिकाणी ती लोक गेली होती . समाजामध्ये विकृत मानसिकतेचे लोकांची संख्या जास्त वाढत आहे . त्याच्यामुळे याच्यावरती सुद्धा समाज म्हणून सरकारने तर कायदे आणलेले आहेत पोलीस तत्पर आहेत .उलट पीडित मुलगी किंवा तिच्या घरचे कोणीच तक्रार द्यायला आले नव्हते. पोलीस केस दाखल करत होते पण अशा परिस्थितीमध्ये समाज म्हणून सुद्धा आपण सगळ्यांनी जागरूक राहणं गरजेचं आहे मुलींनाही मला विनंती करायची की स्वतःच्या सुरक्षिततेचा पहिले विचार आपण केला पाहिजे .  अशी प्रतिकिया पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे .

नराधमांनी शारीरिक अत्याचार करून 5 हजरही काढून घेतले 

जिंतूर पोलीस स्टेशन हद्दीतील भोगाव या गावाच्या जवळील जंगलात एक तरुण-तरुणी फिरायला आलेले असताना 14 तारखेच्या सकाळी सहा मुलांनी त्यांना घेऊन त्यांच्यावर मुलीवर शारीरिक अत्याचार केले . आणि मुलीने घाबरून कोणालाच सांगितले नव्हते . गोपनीय माहिती मिळाल्याबरोबर वेगाने चौकशी करून पोलिसांनी सहाही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या मुलीला शारीरिक अत्याचार करून यांनी तिच्याकडून पाच हजार रुपये देखील काढून घेतलेले होते यापैकी तिघांनी शारीरिक अत्याचार केला इतरांनी त्यासाठी मदत केली या आरोपावरून या सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन विनीवाल यांच्या नेतृत्वात विशेष 8 पथकांची स्थापना करण्यात आलीय अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

महत्त्वाच्या बातम्या

कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget