एक्स्प्लोर

Panvel Crime : रिक्षाने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने पडीक इमारतीत नेऊन तरुणीवर दोघांकडून अत्याचार; आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Panvel Crime : रिक्षातून लिफ्ट देतो असं सांगत दोन आरोपींनी तरुणीला एका पडीक इमारतीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. पनवेलमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Panvel Crime : खोपोली (Khopoli) इथून कामावरुन पनवेल (Panvel) इथे आलेल्या तरुणीवर रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दोघांनी सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची घटना घडली. रिक्षातून लिफ्ट देतो, असं सांगत आरोपींनी तिला एका पडीक इमारतीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी (Panvel Police) दोन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे रोजंदारी करणारे मजूर आहेत. 

नेमकं काय घडलं?

पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादमाने यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, "ही तरुणी पनवेल येथील राहणारी असून ती खोपोली इथल्या एका लेडीज बारमध्ये काम करते. शनिवारी रात्री उशिरा ही तरुणी तिची शिफ्ट संपवून कामावरुन घरी परतत होती. यानंतर ती पनवेलच्या मुख्य रस्त्यावरील ओरियन मॉलजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेली. जेवण आटोपेपर्यंत मध्यरात्र झाली. त्यानंतर ती  घरी जाण्यासाठी मॉलजवळच ऑटोरिक्षाची वाट पाहत थांबली. सामन्यतः या ठिकाणी गर्दी असते. यावेळी, आरोपी तरुणीजवळ आले. उशीर झाला आहे आणि रस्त्यावर एकटीनं थांबणं सुरक्षित नाही. त्यांनी तिला घरी सोडतो असं सांगितलं. तसेच, आम्ही काही अंतरावर ऑटोरिक्षा पार्क केली असल्याचं त्यांनी तरुणीला सांगितलं."

घरी जाण्यासाठी दुसरी रिक्षा न मिळाल्याने ही तरुणी त्यांच्यासोबत गेली. ते मुख्य रस्त्यापासून थोडं अंतर चालत गेल्यावर मॉलच्या मागे एका निर्जन भागात असताना त्यांनी तिला धमकावलं. त्यांनी तिला बळजबरीने रस्त्यापासून दूर नेलं. रेल्वे रुळ ओलांडून स्टेशनपासून थोडं दूर असलेल्या एका पडक्या इमारतीत नेलं. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिच्या डोक्यावर वार करुन जखमी केलं. महिलेने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिला तिथेच सोडून पळ काढला, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादम यांनी सांगितलं.

24 तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

यानंतर तरुणीने पनवेल पोलीस स्टेशन गाठलं आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरुन दोघांची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पनवेल स्थानकाजवळील झोपडपट्टीतून अटक केली. बलात्कार पीडित तरुणीची तक्रार मिळाल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. अविनाश चव्हाण (वय 22 वर्षे) आणि सूरज देवडे (वय 21 वर्षे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपींवर  सामूहिक बलात्कार, अपहरण आणि दुखापत करण्याच्या हेतूने मारहाण या आयपीसीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Panvel Crime : आदिवासी पाड्यावरील प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कुटुंबीय लग्नाला नकार देण्याच्या भीतीने आयुष्य संपवलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget