एक्स्प्लोर

Palghar Latest Crime News : बोईसरमध्ये चोरीच्या घटना वाढल्या, रात्रीत चार दुचाकींची चोरी

Palghar Latest Crime News : बोईसरमध्ये रात्रीत चार दुचाकींची चोरी होण्याची घटना घडली आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Palghar Latest Crime News : बोईसरमध्ये रात्रीत चार दुचाकींची चोरी होण्याची घटना घडली आहे. शहरात चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेय.  

बोईसर पूर्वेकडील बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या सोसायटीमध्ये रहिवाशांनी इमारतीखाली पार्किंग करून ठेवलेल्या चार दुचाकी मंगळवारी मध्यरात्री 2.30 ते तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली. दुचाकी चोरीचा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. या चोरट्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.  बोईसर पोलीस या अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.

बेटेगाव येथील टाटा हाऊसिंग या गृह प्रकल्पातील एम-38,एम-26,एम-13 या इमारतीमधील रहिवाशांनी खाली पार्किंग करून ठेवलेल्या होत्या. या चार दुचाकी मंगळवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरीला गेल्या. अज्ञात चोरट्यांनी मुसळधार पावसाचा फायदा घेत घेतला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. चार ते पाच अज्ञात चोरांनी दुचाकीवर डल्ला मारलाय.  दुचाकी चोरी करताना तोंडाला रुमाल बांधलेले हे सर्व चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. चार दुचाकींची चोरी केल्यानंतर यापैकी दोन दुचाकी महागाव रस्त्यावरील गौशाळेजवळ रस्त्याच्या बाजूला झाडीत टाकून दिल्याचे बुधवारी सकाळी आढळून आले होते. 

चोरीच्या या घटनेप्रकरणी तक्रार केल्यानंतर बोईसर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस चोरट्यांचा कसोशीने शोध घेत आहेत. सणासुदीच्या दिवसात बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत भुरट्या आणि सराईत चोरांनी उच्छाद मांडला आहे.   चोरी, घरफोडी आणि वाहनचोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. चोरीच्या वाढत्या घटनामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण झालेय. सीसीसीटीव्ही असतानाही चोरट्यांनी शिताफीनं चोरी केल्यामुळे या घटनेची स्थानिकांमध्ये चर्चा सुरु आहे. 

रहिवाशांनी सुरक्षेची खबरदारी घ्यावी-पोलिसांचे आवाहन
बोईसर परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होण्याच्या पार्श्वभूमीवर बोईसर पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे.  गृहनिर्माण सोसायट्यानी देखील इमारत आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे, पथदिवे यांची व्यवस्था केली आहे. अनोळखी माणसांना प्रवेश बंदी आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक त्याचप्रमाणे घर किंवा खोली भाड्याने देताना भाडेकरूची संपूर्ण पोलीस पडताळणी करण्याचे आवाहन बोईसर पोलिसांनी नागरिकांना केले आहे. रहिवाशांनी घाबरुन जाऊ नये, सुरक्षेची खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी म्हटलेय.

आणखी वाचा :
Dhule Crime : गुजरातच्या शकुल कंपनीकडून महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांची फसवणूक, 76 कोटी रुपयांचा गंडा

Chinese Loan App Case : चायनीज लोन अ‍ॅपप्रकरणी ईडीची मोठी कारवाई, ऑनलाईन पेमेंट अ‍ॅपवरील 47 कोटी रुपये गोठवले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget