डहाणूत विदेशी दारूसह 27 लाख 24 हजारांचा मुद्देमाल जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Palghar Crime News : राज्य उत्पादन शुल्क, डहाणू विभागाच्या पथकानं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्याची तस्करी करणारा एक कंटेनगर ताब्यात घेतला आहे.
Palghar Crime News : राज्य उत्पादन शुल्क, डहाणू विभागाच्या पथकानं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील आच्छाड जवळील ब्रदर्ष बियर शॉपजवळ पाठलाग करून विदेशी दारूसह 27 लाख 24 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा मद्यसाठा गुजरातच्या दिशेनं नेण्याचा कट असल्याचं कंटेनरच्या चालकानं सांगितलं आहे.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी जवळील आच्छाड काजळी येथून परराज्यातील मद्य वाहतुकीच्या संदर्भात मद्य तस्करी होणार ही माहिती राज्य उत्पादन शुल्क डहाणू निरीक्षक आणि त्यांचा पथकाला मिळली होती. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पाळत ठेऊन पथकानं पाठलाग करून संशयित इसम अशोक लेलंड कंपनीच्या सिल केलेल्या कंटेनरमध्ये तपासणी केली. तपासणी केल्यानंतर कंटेनरमध्ये तस्करीसाठी लपवलेला मद्याचा साठा आढळून आला.
या प्रकरणी चालक सुधाकर रामभाऊ पाटील (वय 55) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासा करण्यात आला. तस्करी करून आणलेला दारू साठा मोकळीक मिळताच गुजरातच्या दिशेनं नेला जाणार होता. ही माहिती पथकाला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पथकानं पाळत ठेवून कारवाई केली. सदर तस्करीची कबुली चालकानं देताच कंटेनरचे सिल तोडलं आणि त्यात महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला आणि केंद्र शासित दादर नगर हवेली येथे विक्रीकरिता असलेला मद्याचा साठा आढळून आला.
दरम्यान, एकूण 210 बॉक्स विदेशी मद्य आणि बियर बॉक्स आणि ट्रक राज्य उत्पादन शुल्कानं ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई डहाणू राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक महेश धनशेट्टी, दुय्यम निरीक्षक किरण धिदले, एम. एम. मानकर यांच्या नेतृत्त्वात करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :