माफियांचा कहर! वाळू वाहतुकीला विरोध केल्यानं युवकाला घरात घुसुन विष पाजलं, बुलढाण्यात गुन्हा दाखल
वाळू वाहतुकीच्या विरोधात तक्रार केल्यानंतर वाळू माफियांनी त्या तरुणाच्या घरात घुसुन त्याला जबरदस्ती विष पाजलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
![माफियांचा कहर! वाळू वाहतुकीला विरोध केल्यानं युवकाला घरात घुसुन विष पाजलं, बुलढाण्यात गुन्हा दाखल Opposing sand transport, youth broke into the house and poisoned him case was registered in Buldhana माफियांचा कहर! वाळू वाहतुकीला विरोध केल्यानं युवकाला घरात घुसुन विष पाजलं, बुलढाण्यात गुन्हा दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/13/6de3f6e0d1f7036162e5dce3500bb3ec_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बुलढाणा : वाळू माफियांच्या माफियागिरीचं एक खळबळजनक उदाहरण समोर आलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद (Buldhana Jalgaon Jamod) तालुक्यातील पूर्णा नदीकाठावरील गोळेगाव गावातील सूरज पांडे या युवकाला तक्रार केल्याच्या कारणावरुन वाळू माफियांनी घरात घुसुन जबरदस्ती विष पाजलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
सूरज पांडे नावाच्या युवकाने घरासमोरून रेती वाहतुकीला विरोध केल्याने गावातील तीन रेतीमाफियांनी या युवकाच्या घरात शिरून विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना काल सांयकाळी घडली आहे. या युवकाच्या घरासमोरून रेतीची वाहने भरधाव जातात, त्यामुळे त्याच्या घरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने या युवकाने या विरुद्ध तक्रार केली होती व रेती वाहतुकीला विरोध केला होता.
यामुळे चिडलेल्या गावातील तिघांनी या युवकाच्या घरात शिरून बळजबरीने युवकाला विषारी औषध पाजलं. सध्या या युवकाची प्रकृती गंभीर असून त्याला उपचारासाठी खामगाव येथील सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आलंय.
युवकाच्या भावाने यासंबंधी जळगाव जामोद पोलीसात तक्रार दिली असून पोलिसांनी तिघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जळगाव जामोद पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
इतर महत्वाच्या बातम्या
- ...तरच कोरोनाबाधित असलेली इमारत सील करणार; BMC कडून इमारत सील करण्याबाबत सुधारीत धोरण जाहीर
- ...तर मुंबईत लॉकडाऊन; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
- Coronavirus Omicron Variant : लहान मुलांना देखील ओमायक्रॉनचा धोका? पाहा काय म्हणाले तज्ज्ञ
- अमेरिकेतून आलेल्या वराला फसवणं महागात! पुण्यातील मुलीसह कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)