एक्स्प्लोर

Nashik Crime : 'रागाने का बघतो' विचारल्यावर उफाळला वाद, टोळक्याने 20 वर्षीय युवकाला कोयत्याने वार करत संपवलं, एक गंभीर, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Crime : पाथर्डी फाटा परिसरात मद्यपींच्या चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून दोन भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime : नाशिक शहर पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले आहे. पाथर्डी फाटा (Pathardi Phata) परिसरात असलेल्या फाळके स्मारकजवळील (Phalke Smarak) एका हॉटेलमध्ये मद्यपींच्या चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून दोन भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. यात राम बोराडे (20) याचा मृत्यू झाला आहे तर राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहे.  या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलमध्ये बसलेल्या चार ते पाच मद्यपींकडून रागाने का बघतो म्हणून वाद घालण्यात आला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. टोळक्याने कोयत्याने वार करून राम बोराडे आणि त्याचा चुलत भाऊ राजेश बोराडे या दोघांवर सपासप वार करण्यात आले. 

वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न

या हल्ल्यामध्ये राम बोराडे याचा जागीच मृत्यू झाला असून राजेश बोराडे हा गंभीर जखमी झाला आहेत. त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर टोळक्याने परिसरातील चारचाकी वाहनांची देखील तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. 

टोळक्याकडून रिक्षाचालकावर धारदार शस्त्राने वार

दरम्यान,  नाशिकच्या श्रमिकनगर परिसरातील कडेपठार येथे दोन जणांच्या वादात झालेल्या मारहाणीत रिक्षाचालक इसमाचा उपचारदरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली. प्रकाश मधुकर सूर्यवंशी (39) असे मृत झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून मृत प्रकाश सूर्यवंशी हे स्वामी नरेंद छाया हाइट्स कडेपठार सोसायटीत कुटुंबासोबत राहत होते. गुरुवारी रात्री त्याच सोसायटीत राहणारे गणेश पाटील हे रात्री बारा वाजता सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत उभे होते. याच दरम्यान चार संशयित हे गणेश पाटील यांच्या आतेभाऊ असलेल्या किरण जमदाडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून मारहाण करण्यास आले होते. टोळक्याने त्यांचा भाऊ गणेश पाटील यांना किरण जमदाडेबाबत विचारपूस केली. किरण जमदाडे न भेटल्याने संशयित टोळक्याने पाटील यांच्यावर हल्ला केला. हा वाद सोडवण्याचा प्रकाश सूर्यवंशी प्रयत्न करीत असताना टोळक्याने कोयता व धारदार शस्त्राने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जखमी झालेल्या सूर्यवंशी यांना रात्री नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी प्रकाश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला.  

आणखी वाचा 

Nashik Crime : नाशिकमध्ये भयंकर प्रकार, तडीपार गुंडाकडून धावत्या बसला रिक्षा आडवी घालत नग्न होऊन महिलेचा विनयभंग, बसच्या काचाही फोडल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar Rename as Dwarkadhish: विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांकडून पाठिंबा, सोशल मिडीयावर संतापाची लाट; नेमकं प्रकरण काय?
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Embed widget